Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Tips : शुक्रवारी अर्थात मार्च सिरिजच्या पहिल्या दिवशी बाजार अस्थिर दिसून आला. सलग सहाव्या दिवशी निफ्टी खाली बंद झाला. सेन्सेक्स 142 अंकांनी घसरून 59464 वर बंद झाला. तर निफ्टी 45 अंकांनी घसरून 17466 वर बंद झाला.

शुक्रवारी सर्वाधिक विक्री मेटल शेअर्समध्ये दिसली. ऑटो, रिअॅल्टी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता. सीपीएसई, एनर्जी, पीएसई इंडेक्स काहीशा वाढीसह बंद झाले. फार्मा आणि इन्फ्रा इंडेक्सही किरकोळ वाढीसह बंद झाले.

मागच्या आठवड्याचा विचार केल्यास 12 जून 2022 नंतर बाजारातील सर्वात वाईट विकली क्लोझिंग पाहायला मिळाली. त्या आठवड्यात निफ्टी-सेन्सेक्स 2.5 टक्क्यांनी घसरला. निफ्टी बँक 3 टक्क्यांच्या आसपास घसरली.

मिडकॅप निर्देशांक 1.5 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरला. या आठवड्यात मेटल इंडेक्स 6.5 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, रियल्टी इंडेक्स सुमारे 6 टक्क्यांनी घसरला. तर आयटी इंडेक्स विकली आधारावर 1.7 टक्क्यांनी घसरला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने पुन्हा एकदा फॉलिंग चॅनलमध्ये प्रवेश केला आहे जे आणखी कमजोरी दर्शवते असे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. त्याचे 50DMA आणि 14DMA बियरिश क्रॉसओव्हर दाखवत आहेत.

मोमेंटम ऑसिलेटर RSI (14) 50 च्या खाली घसरला आहे. हे सर्व नकारात्मक संकेत आहेत. निफ्टीच्या सध्याच्या सेटअपवरून असे दिसते की त्यावर आणखी दबाव असेल. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 17150-17200 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. निफ्टीसाठी 17800 वर रझिस्टंस दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ट्रेंट (TRENT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.