Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Investment Tips : गुरुवारी शेअर बाजारात विक्री होताना दिसून आली. निफ्टी-सेन्सेक्स जवळपास 1 टक्क्यांनी घसरून बंद झाले. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.55 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

त्याच वेळी, स्मॉलकॅप इंडेक्स 0.2 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. ऑटो, रियल्टी आणि आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एनर्जी, एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्सवरही दबाव दिसून आला. मेटल इंडेक्स मात्र वाढीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 541.81 अंकांनी म्हणजेच 0.90 टक्क्यांनी घसरून 59806.28 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 164.80 अंकांच्या अर्थात 0.93 टक्क्यांच्या घसरणीसह 17589.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

यूएस फेडच्या अध्यक्षांच्या व्याजदरांबाबतच्या कठोर विधानामुळे बाजारावर दबाव दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

आगामी यूएस जॉब डेटा आगामी एफओएमसी मिटींगमध्ये फेडच्या धोरणात्मक निर्णयांवर त्याचा परिणाम दाखवेल. जॉब डेटा अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यास यूएस फेड आपले धोरण दर 0.50 टक्क्यांनी वाढवू शकते.

3 दिवसांच्या रिलीफ रॅलीनंतर गुरुवारी बाजारात विक्री दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. युएस फेडकडून व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे आणि वाढत्या बॉन्ड यील्डमुळे बाजारावर दबाव दिसून आला.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने लाँग बियरीश कँडल तयार केली आहे. हे सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी कमजोरी दर्शवते. निफ्टीसाठी 17650 वर रझिस्टन्स दिसत आहे.

जर निफ्टी या रझिस्टन्सच्या वर गेला नाही तर त्यावर वाढता दबाव दिसून येईल आणि 17500-17450 च्या दिशेने घसरताना दिसेल. दुसरीकडे, निफ्टीने 17650 चा हा रझिस्टन्स पार केल्यास, 17700-17750 पर्यंत इंट्राडे पुलबॅक रॅली दिसू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • डिक्सन (DIXON)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • व्हॉल्टास (VOLTAS)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.