Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला? |Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 15 May 2023 before the market opens know details | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Investment Tips

Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजार एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्स 123 अंकांच्या वाढीसह 62028 वर बंद झाला, तर निफ्टी 18 अंकांच्या वाढीसह 18315 वर बंद झाला. सर्वात जास्त घसरण आयटी, मेटल आणि मीडिया शेअर्समध्ये झाली.

त्याच वेळी, ऑटो, बँक आणि फायनांशियल सेक्टर्स वाढीसह बंद झाले. बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाली, त्यामुळे निफ्टी बँक 318 अंकांनी वाढून 43794 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवर दबाव दिसून आला. मिडकॅप 133 अंकांनी घसरून 32468 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमजोर आशियाई संकेतांमुळे इंट्रा-डे सत्रात बाजार अस्थिर राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. पण काही बँकिंग आणि ऑटोमोबाईल शेअर्समध्ये खरेदी झाल्याने बाजार सावरला. बाजार सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये दिसत आहे.

यासोबतच व्याजदरांबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. तांत्रिकदृष्ट्या, मजबूत अपट्रेंड रॅलीनंतर निफ्टी 10-दिवसांच्या एसएमएवर (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) ट्रेड करत आहे. यासोबतच हायर बॉटमही बनवत आहे, जे येत्या काळात तेजीचे संकेत देत आहेत.

विकली चार्टवर, इंडेक्सने एक लाँग बुलिश कँडल तयार केली आहे जी अपट्रेंड चालू ठेवण्याचे संकेत देते. आता जोपर्यंत निफ्टी 10-दिवस एसएमए किंवा 18200 च्या वर ट्रेडिंग करत आहे, तोपर्यंत तेजीची शक्यता असेल.

18200 च्या वर गेल्यावर, इंडेक्स 18450-18550 च्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर इंडेक्स 18200 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 18000 पर्यंत वाढू शकते.

43500 ही बँक निफ्टीसाठी सर्वात महत्त्वाची पातळी असेल असे अमोल आठवले म्हणाले. याच्या वर गेल्यास 44000-44300 पर्यंत जाईल. दुसरीकडे, जर ते 43500 च्या खाली ट्रेड करत असेल तर शॉर्ट टर्म करेक्शन शक्य आहे. त्यामुळे निफ्टी 43000-42800 पर्यंत घसरू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ए यू बँक (AUBANK)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • पेज इंडिया (PAGEIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.