Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

बुधवारी निफ्टीमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण दिसून आली.
Share Market Tips
Share Market TipsSakal

Share Market Investment Tips : बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 344.29 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी घसरून 57555.90 वर बंद झाला.

दुसरीकडे, निफ्टी 71.10 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 16972.20 वर बंद झाला. बुधवारी सुमारे 1508 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1924 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात वाढीने झाली, पण त्याला आपली आघाडी कायम ठेवता आली नाही आणि व्यवसायाच्या शेवटी 70 पेक्षा जास्त गुणांनी तोटा झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले.

निफ्टीला इंट्राडेमध्ये 17200 च्या पातळीजवळ मोठ्या रझिस्टंसचा सामना करावा लागला. निफ्टीने 16950 चे शॉर्ट टर्म टारगेट गाठले आहे. अशा परिस्थितीत, डाउनसाइडवर त्याचे पुढील टारगेट 16750 आहे.

बुधवारी निफ्टीमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण दिसून आल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. येत्या काळात निफ्टी 16747-17166 च्या रेंजमध्ये फिरताना दिसून येईल. निफ्टी 5 महिन्यांच्या कालावधीनंतर 17000 च्या खाली बंद झाला.

Share Market Tips
SVB Collapse : अमेरिकेत मोठ्या बँका कोसळत आहेत? आपल्या देशातील बँका सुरक्षित आहेत का?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

  • ए यू बँक (AUBANK)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Tips
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com