Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips : विकली एक्सपायरी अर्थात गुरुवारी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. पण या अस्थिरतेच्या दरम्यान निफ्टी सकारात्मक ट्रेंडसह फ्लॅट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 78.94 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 57634.84 च्या पातळीवर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 13.40 अंकांच्या म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 16985.60 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

क्रेडिट सुईसमधील उलथापालथ आणि ईसीबी धोरणाच्या घोषणेपूर्वी गुंतवणूकदारांचे लक्ष युरोपियन बाजारांकडे असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार डॉलर आणि सोने यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळत असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी भारतीय रुपयाची घसरण पाहता विदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय बाजारातून आपला पैसा काढून घेत आहेत.

सलग 5 दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले. आवर्ली चार्टवर पॉझिटिव्ह डायव्हर्जंस आणि पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर सूचित करतात की हा तेजीचा कल पुढील काही दिवसांसाठी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टीमध्ये 1000 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. पुढील काही व्यापार सत्रांमध्ये बाजारात दिलासादायक तेजी पाहायला मिळू शकते. निफ्टीच्या वरच्या बाजूस पहिला रझिस्टंस 17170- 17200 वर दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • टायटन (TITAN)

  • व्हॉल्यूम (VOLUME)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.