Share Market Tips: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?|Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 19 May 2023 before the market opens know details | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Tips: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips: गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. गुरुवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र ही तेजी टिकवता आली नाही.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 129 अंकांनी अर्थात 0.21 टक्क्यांनी घसरून 61431.74 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 52 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 18130 च्या पातळीवर बंद झाला.

चांगल्या जागतिक संकेतांच्या दरम्यान बाजार तेजीने उघडला पण नंतर सर्व सेक्टर्समध्ये प्रॉफीट बुकिंगचे वर्चस्व राहिले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने वाढीसह सुरुवात केली पण ती टिकवता आली नाही आणि शेवटी 50 अंकांच्या तोट्याने बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले.

आवर्ली चार्टवर नजर टाकल्यास निफ्टीला महत्त्वाच्या आवर्ली मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास रझिस्टंसचा सामना करावा लागला आहे आणि इथून विक्री झाली. पुढे जाऊन, निफ्टीला 18300 - 18350 वर मोठा रझिस्टंस आहे.

निफ्टी आता 18079 च्या महत्त्वाच्या सपोर्टच्या जवळ येत आहे. जे 20 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास आहे.

निफ्टीला डाउनसाइडवर अनेक सपोर्ट्स आहेत जे कोणतीही मोठी पडझड टाळतील. डेली मोमेंटम इंडिकेटरमध्ये नेगिटीव्ह क्रॉसओव्हर दिसत आहे. हा सेल सिग्नल आहे. निफ्टी पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये 18400 - 18000 च्या रेंजमध्ये कंसोलिडेट होत साईडवेज राहू शकेल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • आयटीसी (ITC)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • पॉवर ग्रीड (POWERGRID)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.