Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?|Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 22 May 2023 before the market opens | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजारात तेजी दिसून आली. सर्वाधिक खरेदी बँकिंग शेअर्समध्ये झाली. याशिवाय आयटी, रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

मेटल, इन्फ्रा, पीएसयू बँक इंडेक्स वाढीसह बंद झाले. त्याचबरोबर फार्मा आणि पीएसई शेअर्सवर दबाव दिसून आला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 297.94 अंकांनी अर्थात 0.48 टक्क्यांनी वाढून 61729.68 वर आणि निफ्टी 73.40 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी वाढून 18203.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीसाठी शुक्रवार तसा दिवस अस्थिर राहिल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या सेशनमध्ये निफ्टी तेजीसह खुला झाला आणि मग लाल रंगात घसरला.

खाली, निफ्टीने 20-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज 18108 स्तरावर सपोर्ट घेतला आणि इथून सावरला. त्यामुळे सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर निफ्टी हिरव्या रंगात बंद झाला.

आवर्ली मोमेंटम इंडिकेटरवर दिसणारे पॉझिटीव्ह डायव्हर्जंस ही घसरण थांबण्याची चिन्हे दाखवत आहे. आता पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टीमध्ये तेजी दिसून येईल.

18300 - 18350 रझिस्टंस दिसत आहे तर 18100 - 18050 वर सपोर्ट आहे. एकंदरीत, निफ्टी अजूनही कंसोलिडेशनच्या मोडमध्ये असल्याचे दिसते आणि 18000 - 18400 च्या झोनमध्ये आणखी कंसोलिडेट होऊ शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • इन्फोसिस (INFY)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पीएनबी (PNB)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.