Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Investment Tips : शेअर बाजारात शुक्रवारी आनंदाचे वातावरण दिसून आले. अदानीच्या ब्लॉक डीलचा प्रभाव आणि अमेरिकेतून काही चांगल्या बातम्या आल्याने बाजारात अतिशय सकारात्मक वातावरण होते.

सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांनी वर चढत 2 आठवड्यांच्या वरच्या पातळीवर बंद झाले आहेत. सेन्सेक्स 900 अंकांनी वाढून 59809 वर बंद झाला.

दुसरीकडे, निफ्टी 272 अंकांनी वाढून 17594 वर बंद झाला. निफ्टी बँक 862 अंकांनी वाढून 41251 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 211 अंकांनी वाढून 30698 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवारी बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. अलीकडच्या बाजारातील घसरणीमुळे व्हॅल्युएशनन चांगले दिसत होते.

त्याचा फायदा ट्रे़डर्सने घेतला आणि बाजारात मोठ्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळाले. जोपर्यंत निफ्टी 17400 च्या वर टिकेल तोपर्यंत तेजीत राहण्याची शक्यता आहे. 17550-17500 वर पहिला सपोर्ट आहे तर 17700-17850 वर रझिस्टंस आहे.

निफ्टीमध्ये जोरदार पुलबॅक दिसल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. हा पुलबॅक 17700 पर्यंत जाताना दिसेल. मात्र आता कंसोलिडेशनची शक्यता नाकारता येत नाही. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 17700 - 17200 च्या रेंजमध्ये व्यापार करेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.