Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

गेल्या आठवड्यात यूएस फेडकडून व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने बाजारावर दबाव होता
Share Market
Share MarketSakal

Share Market Investment Tips : सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद झाले. निफ्टी 17700 च्या वर बंद झाला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 415.49 अंकांच्या म्हणजेच 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 60224.46 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 117.20 अंकांच्या म्हणजेच 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 17711.50 च्या पातळीवर बंद झाला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गेल्या आठवडय़ात यूएस फेडकडून व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने बाजाराचा दबाव होता असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. त्यामुळे यूएस ट्रेझरी यील्ड आणि डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आली.

जो बाजारासाठी नेगिटीव्ह फॅक्टर म्हणून काम करत होता. यासोबतच अदानी ग्रुपबाबतही अनिश्चितता होती.

पण अमेरिकन अधिकाऱ्यांकडून आर्थिक धोरणे नरम होण्याची चिन्हे आणि अदानी ग्रुपमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे बाजाराचा सोमवारी चांगले वातावरण होते. भारतीय बाजारात एफआयआयच्या खरेदीमुळे जोरदार रिकव्हरी झाली आहे.

बँक निफ्टी इंडेक्समध्ये काही प्रमाणात विक्री झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. अशा परिस्थितीत बँकिंग शेअर्सच्या घसरणीवर खरेदीचा सल्ला त्यांनी दिला. बँक निफ्टीला 41000 च्या खाली सपोर्ट दिसत आहे. तर, वरच्या बाजूला, 42000 वर रझिस्टंस आहे.

Share Market
Gold Silver Price : होळीला सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • ओएनजीसी (ONGC)

  • एनटीपीसी (NTPC)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

Share Market
परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com