Share Market : ''या' शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत; केवळ दोन वर्षात दिला पाचपट रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : ''या' शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत; केवळ दोन वर्षात दिला पाचपट रिटर्न

Share Market : पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेकच्या (Polo Queen Industrial and Fintech) शेअर्सने गुंतवणूकदारांना मागच्या दोन वर्षांपासून छप्परफाड परतावा दिला आहे. अवघ्या दोन वर्षांत त्यांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5200 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.

सध्या मात्र ते एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरलेत, पण नंतर त्यांनी चांगली रिकव्हरी केली. सध्या हे शेअर्स बीएसईवर 16.59 टक्क्यांच्या वाढीसह 47.80 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत.

पोलो क्वीनचे शेअर्स 6 एप्रिल 2021 रोजी फक्त 90 पैशांना मिळत होते. आता त्याची किंमत 47.80 रुपये आहे, म्हणजेच दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 5211 टक्के परतावा मिळाला आहे.

गेल्या वर्षी 17 मार्च 2022 रोजी त्याचे शेअर्स 85.30 रुपयांवर होते, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे. मात्र, त्यानंतर पुढील एका वर्षातच तो 34.20 रुपयांवर गेला. त्यानंतर त्यात 40 टक्के रिकव्हरी झाली आहे.

पोलो क्वीन ही राजकमलच्या इंडस्ट्रियल आणि फिनटेक हाउसची कंपनी आहे. ही कंपनी मिनरल ट्रेडिंग, फार्मा, एफएमसीजी प्रॉडक्ट्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित गुंतली आहे. शिवाय ही कंपनी फायनान्स सेगमेंटमध्येही आहे.

कंपनीसाठी डिसेंबर तिमाही काहीशी निराशाजनक होती. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत त्याची कमाई 19.77 कोटी रुपये होती, तर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत महसूल केवळ 19.10 कोटी रुपये होता. त्याचा नफाही याच कालावधीत 1 कोटी रुपयांवरून 63 लाख रुपयांवर घसरला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.