Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Share Market Opening 10 March 2023 : देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचा कल आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. नकारात्मक जागतिक संकेतांमुळे, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने घसरणीसह व्यवहार करत आहेत.

जागतिक बाजारात मोठी घसरण :

परदेशी बाजारांवर नजर टाकल्यास गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 1.85 टक्के, तर S&P 500 1.66 टक्के खाली होते.

आजच्या व्यवहारादरम्यान आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. लंडन आणि युरोपातील इतर बाजारपेठाही फ्युचर ट्रेडिंगमध्ये घसरल्या.

आज बाजाराची स्थिती :

सेन्सेक्समध्ये केवळ दोन कंपन्या वगळता सर्व शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात तोट्यात होते. सुरुवातीच्या व्यापारात फक्त टाटा मोटर्स आणि भारती एअरटेलचे शेअर्स नफ्यात होते.

दुसरीकडे इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स यांसारखे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत घसरले.

547 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 59,259.83 वर उघडला. निफ्टी 138 अंकांनी घसरल्यानंतर 17,443.80 वर व्यवहार सुरू झाला. बाजार उघडल्यानंतरच बाजारात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला. निफ्टी 17,400 च्या खाली आहे.

BSE India

BSE India

'या' शेअर्समध्ये घसरण :

अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स हे निफ्टीमधील शेअर्स घसरले.

'या' शेअर्समध्ये तेजी :

टाटा मोटर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि बजाज ऑटो हे निफ्टीमधील शेअर्स तेजीत आहेत.

अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 5% घसरला :

देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्याने अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरचे भाव पाच टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे हिंदाल्कोमध्ये 2.12 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.96 टक्के, बजाज फायनान्समध्ये 1.89 टक्के आणि एचडीएफसी बँकेत 1.77 टक्के घसरण दिसून आली.