Share Market Opening: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स 110 अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये...|Share Market Opening latest updates today 11 May 2023 bse nse sensex nifty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market latest updates today

Share Market Opening: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स 110 अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये...

Share Market Opening 11 May 2023: शेअर बाजार गुरुवारी तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्सने सुरुवातीच्या व्यवहारात 62000 ची महत्त्वाची पातळी ओलांडली. त्याचप्रमाणे निफ्टी 18300 च्या वर व्यवहार करत आहे.

बाजारामध्ये आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. दुसरीकडे, डॉ. रेड्डीजच्या खराब निकालामुळे फार्मा क्षेत्रात विक्री दिसून येत आहे. याआधी बुधवारी देशांतर्गत बाजारात तेजी होती. BSE सेन्सेक्स 178 अंकांनी 61,940 वर बंद झाला आणि निफ्टी 49 अंकांनी 18,315 वर बंद झाला.

Share Market Opening 11 May 2023

Share Market Opening 11 May 2023

सुरुवातीच्या व्यवसायामध्ये मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 6 कंपन्याचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात 24 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. मोठ्या कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएल टेक सारख्या आयटी कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

गुरुवारी, बीएसई सेन्सेक्समध्ये टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक 0.75 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. याशिवाय एचडीएफसी, एनटीपीसी, टीसीएस, इन्फोसिस, एशियन पेंट्सचे शेअर्स 0.50 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत होते.

एचडीएफसी बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि सन फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, नेस्ले इंडियाचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 43.5 अंकांच्या किंवा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 18,402 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

'या' कंपन्यांचे निकाल आज येतील

Asian Paints, Siemens, Eicher Motors, Aditya Birla Capital, Dr Lal Path Labs, Gujarat state Petronet आणि इतर अनेक कंपन्याचे आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील.