Share Market Opening : शेअर बाजार किंचित तेजीसह उघडला; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 3 शेअर्स घसरणीसह व्यवसाय करत आहे
share market
share market sakal

Share Market Opening 13 March 2023 : आज देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल प्री-ओपनिंगमध्ये थोडीशी डळमळीत झाली होती, परंतु बाजार उघडण्याच्या वेळी निफ्टी हिरव्या चिन्हावर परतला.

सेन्सेक्सची घसरणही कमी झाली आणि तो 100 अंकांच्या घसरणीनंतर उघडला. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे अमेरिकन बाजारातील गोंधळाचा भारतीय शेअर बाजारावर सध्या फारसा नकारात्मक परिणाम होत नाहीये.

बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स आज 101.36 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी घसरल्यानंतर 59,033.77 वर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 9 अंकांच्या किंचित वाढीनंतर 17,421.90 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती :

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 3 शेअर्स घसरणीसह व्यवसाय करत आहे आणि 27 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्स तेजीत असून 3 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

share market
IPO News : ग्लोबल सरफेसचा आयपीओ आजपासून खुला, किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

'या' शेअर्समध्ये तेजी :

टेक महिंद्रा आज सेन्सेक्स शेअर्समध्ये 8 टक्क्यांहून अधिक उसळीसह व्यवहार करत आहे. कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स तेजीत आहेत.

याशिवाय बजाज फायनान्स, एचडीएफसी, एचयूएल, एसबीआय, टीसीएस, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्सही जोरदार व्यवहार करत आहेत. आयटीसी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्येही वाढ झाली आहे.

'या' शेअर्समध्ये घसरण :

एशियन पेंट्स, नेस्ले, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एनटीपीसी, टायटन हे शेअर घसरताना दिसत आहेत.

share market
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com