Share Market Opening : चार दिवसांच्या घसरणीला लागला ब्रेक; शेअर बाजार तेजीसह उघडला, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : चार दिवसांच्या घसरणीला लागला ब्रेक; शेअर बाजार तेजीसह उघडला, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

Share Market Opening 15 March 2023 : चांगल्या जागतिक संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजार तेजीत उघडला. सेन्सेक्स 58400 आणि निफ्टी 17200 जवळ व्यवहार करत आहे.

सरकारी बँकिंग शेअर्स, आयटी, ऑटो आणि मेटल शेअर्स बाजारातील सर्वांगीण तेजीत सर्वाधिक वाढले आहेत. मारुती, अदानी एंटरप्रायझेस आणि एशियन पेंट्सचे शेअर्स निफ्टीमध्ये 2-2% च्या तेजीसह व्यवहार करत आहेत.

तत्पूर्वी, मंगळवारी सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 337 अंकांनी घसरून 57,900 वर आणि निफ्टी 111 अंकांनी घसरून 17,043 वर बंद झाला.

BSE India

BSE India

शेअर बाजारातील तेजीची कारणे :

  • आशियाई, अमेरिकन आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये वाढ

  • अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत आहे

  • यूएस बाँड उत्पन्नात वाढ

  • आरआयएल, टीसीएस, मारुतीसह इतर हेवीवेट शेअर्समध्ये वाढ

अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर भारती एअरटेल, सन फार्मा, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि ओएनजीसी शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.

बुधवारी सकाळी सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात एनडीटीव्ही, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

शेअर बाजारातील तेजीमनाढे मारुती सुझुकीचे शेअर्स बुधवारी सकाळच्या व्यवहारात वाढले तर एसबीआय कार्ड, बजाज फायनान्स लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयआरसीटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस लिमिटेड आणि मुथूट फायनान्सचे शेअर्सही तेजीत व्यवहार करत होते.

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास सर्वच क्षेत्र हिरव्या चिन्हात व्यवहार करत होते. सेन्सेक्समध्ये मारुती, टायटन, एशियन पेंट्स आणि इंडसइंड बँक हे आघाडीवर होते. भारती एअरटेल आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे.