Share Market Opening: बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 62,100 वर, टाटा मोटर्समध्ये...|Share Market Opening latest updates today 15 May 2023 bse nse sensex nifty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening: बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 62,100 वर, टाटा मोटर्समध्ये...

Share Market Opening 15 May 2023: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह उघडला. BSE सेन्सेक्स 150 हून अधिक अंकांच्या वाढीसह 62,150 च्या वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही जवळपास 30 अंकांच्या तेजीसह 18,350 च्या जवळ व्यवहार करत आहे.

बाजारातील तेजीत रियल्टी आणि ऑटो शेअर्स आघाडीवर आहेत. निफ्टीमध्ये टाटा मोटर्स 3.4% वाढीसह प्रथम स्थानावर आहे. तर सिप्लाचा शेअर 2.5% घसरला आहे. याआधी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 117 अंकांनी वाढून 62,021 वर तर निफ्टी 14 अंकांच्या वाढीसह 18,311 वर बंद झाला.

Share Market Opening 15 May 2023

Share Market Opening 15 May 2023

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 20 शेअर्सचे व्यवहार वेगाने होत आहेत आणि 10 शेअर्समध्ये घसरण होत आहे. याशिवाय NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स तेजीसह तर 19 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज निफ्टीच्या ऑटो, फायनान्शिअल, एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्येही तेजी आहे. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले आहेत.

रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक 0.91 टक्क्यांची वाढ दिसून येत असून ऑटो शेअर्समध्ये 0.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. घसरलेल्या क्षेत्रांवर नजर टाकली तर धातूच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.05 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

सेन्सेक्सच्या 'या' शेअर्समध्ये तेजी:

टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, पॉवरग्रीड, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट यांच्या व्यतिरिक्त बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.

सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्स हे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सच्या 'या' शेअर्समध्ये घसरण:

टाटा स्टील, सन फार्मा, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि एनटीपीसी शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

या कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार:

Tube Investments, Astral, Coromandel Internation, Pfizer, PVR Inox सारख्या अनेक कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करतील.

आशियाई शेअर बाजारांसाठी सावध सुरुवात:

चीनच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी आशियाई शेअर बाजारांनी सावधपणे सुरुवात केली आहे.