
Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत, मिड कॅप शेअर्समध्ये घसरण
Share Market Opening 19 May 2023: शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली आहे. BSE सेन्सेक्स 150 अंकांच्या तेजीसह 61600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीही 18150 च्या वर आहे. बाजारातील वाढीचे कारण जागतिक संकेत आहेत.
बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे. तत्पूर्वी, गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात विक्रीची नोंद झाली. BSE सेन्सेक्स 128 अंकांनी घसरून 61,431 वर आणि निफ्टी 52 अंकांनी घसरून 18,129 वर बंद झाला होता.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:
बीएसई सेन्सेक्सवर, एसबीआयचा शेअर सर्वाधिक 1.54 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एचसीएल टेक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, टीसीएस आणि सन फार्मा या कंपन्यांमध्ये 0.82 टक्क्यांनी मोठी तेजी दिसून आली.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:
सेन्सेक्सवर ITC 1.13 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो आणि मारुती यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, मीडिया आणि हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजी आहे. ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्येही घसरण आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 24 शेअर्स तेजीसह तर 26 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आज 'या' कंपन्या तिमाही निकाल जाहीर होणार:
NTPC, Zomato, JSW स्टील, पंजाब नॅशनल बँक (PNB), दिल्लीवेरी, बंधन बँक यासह अनेक कंपन्या आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
आजचा व्यवसाय कसा असेल ते जाणून घ्या
मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तपासे यांनी सांगितले की, सकारात्मक जागतिक संकेतांमध्ये दलाल स्ट्रीटची सुरुवात तेजीसह झाली आहे, परंतु बाजारात अस्थिर कल दिसू शकतो.