
Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण, 'या' शेअर्सचे मोठे नुकसान
Share Market Opening : बुधवारच्या प्रभावी वाढीनंतर भारतीय शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह उघडला. जागतिक संकेतांमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्स 124 अंकांनी घसरून 59,287 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजार 29 अंकांनी घसरून 17,421 अंकांवर बंद झाला.
बाजारातील घसरण वाढली असून सेन्सेक्स 225 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी 60 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
आजच्या व्यवहारात बँकिंग, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ आहे, तर आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण आहे. स्मॉल कॅप किंचित वाढीसह व्यवहार करत आहे तर मिडकॅप निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 8 समभाग वाढीसह तर 22 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 15 समभागांमध्ये 35 घसरणीसह वेगाने व्यवहार होत आहेत.
'या' शेअर्समध्ये तेजी :
आजच्या व्यवहारात, बजाज फिनसर्व्ह 1.61%, हिरो मोटोकॉर्प 1.44%, लार्सन 0.98%, जेएसडब्ल्यू स्टील 0.76%, टाटा स्टील 0.62%, हिंदाल्को 0.24%, अल्ट्राटेक सिमेंट 0.20%, एचडीएफसी बँक 0.58% हे शेअर्स तेजीने व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये घसरण :
घसरलेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 1.41 टक्के, टेक महिंद्रा 1.40 टक्के, टीसीएस 1.32 टक्के, इन्फोसिस 1.31 टक्के, मारुती सुझुकी 1.24 टक्के, अॅक्सिस बँक 1.18 टक्के, टाटा मोटर्स 9 टक्के, विप्रो 1.9 टक्के, एसबीआय 0.61 टक्के आणि एचयूएल 0.61 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र कल
जागतिक बाजारात संमिश्र कल आहे. आशियाई बाजार काही तेजीसह तर काही घसरणीसह व्यवहार करत आहेत. निक्केई 0.13 टक्क्यांनी, स्ट्रेट टाइम्स 0.59 टक्क्यांनी, हँगसेंग 0.75 टक्क्यांनी, तैवान 0.08 टक्क्यांनी घसरत आहे. तर कोस्पी, जकार्ताचे बाजार किंचित वाढीसह व्यवहार करत आहेत. याआधी बुधवारी अमेरिकन शेअर बाजार सपाट व्यवहारानंतर बंद झाला होता.