Share Market Opening : शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे
Share Market Opening Latest Updates Today 22 March 2023 bse nse sensex nifty
Share Market Opening Latest Updates Today 22 March 2023 bse nse sensex nifty Sakal

Share Market Opening On 22 March 2023 : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण देशाच्या विविध भागात अनेक सण साजरे केले जात आहेत. चैत्र नवरात्र ही उत्तर भारतात भारतीय नववर्षाची सुरुवात आहे.

तर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. काही राज्यांमध्ये उगादी साजरे केले जात आहेत. देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टीमध्ये संमिश्र व्यवसाय दिसून येत होता, परंतु बाजार उघडताच दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हात आले आहेत.

देशांतर्गत बाजार उघडताना बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 170.58 अंकांच्या म्हणजेच 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 58,245.26 वर उघडला. यासह, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 69.95 अंकांच्या किंवा 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 17,177.45 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती :

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स तेजीत आहेत आणि 7 शेअर्स घसरत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्स हिरव्या चिन्हात जोरदार व्यवहार करत आहेत आणि 11 शेअर्स घसरत आहेत. (Share Market Opening Latest Updates Today 22 March 2023 bse nse sensex nifty)

BSE India
BSE IndiaSakal
Share Market Opening Latest Updates Today 22 March 2023 bse nse sensex nifty
Gold Silver Price : गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

निफ्टीमध्ये आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत. मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक 1.09 टक्‍क्‍यांची वाढ दिसून येत असून आयटी शेअर्सनी एक टक्‍क्‍यांनी उसळी घेतली आहे.

ऑटो शेअर्स 0.83 टक्क्यांनी वाढले आहेत. PSU बँकेच्या शेअर्समध्ये 0.67 टक्के, रियल्टी शेअर्समध्ये 0.51 टक्के आणि ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये 0.5 टक्के मजबूतीसह व्यवहार सुरू आहेत.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वधारले :

बजाज फायनान्स 1.46 टक्के, एलअँडटी 1.39 टक्के, एचसीएल टेक 1.39 टक्के, एमअँडएम 1.37 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.36 टक्के आणि टाटा मोटर्स 1.16 टक्क्यांनी व्यापार करत आहेत.

याशिवाय इंडसइंड बँक, रिलायन्स, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, विप्रो, एसबीआय, सन फार्मा, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक आणि टायटन यांच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

Share Market Opening Latest Updates Today 22 March 2023 bse nse sensex nifty
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com