Share Market Opening: कमकुवत सुरुवातीनंतर बाजारात तेजी; सेन्सेक्स 61800 पार, अदानी शेअर्समध्ये... |Share Market Opening latest updates today 22 May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening: कमकुवत सुरुवातीनंतर बाजारात तेजी; सेन्सेक्स 61800 पार, अदानी शेअर्समध्ये...

Share Market Opening 22 May 2023: सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात कमजोर झाली. मात्र, बाजारातील सुरुवातीच्या कमजोरीनंतर किंचित तेजी दिसून येत आहे. BSE सेन्सेक्स सुमारे 100 अंकांच्या तेजीसह 61800 च्या वर व्यवहार करत आहे.

निफ्टी देखील 18250 च्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारात मेटल आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. निफ्टीमध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आहे, ज्यामध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 4% वर आहेत.

याआधी शुक्रवारी भारतीय बाजारात 3 दिवसांनंतर तेजीची नोंद झाली होती. BSE सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 61,729 वर बंद झाला आणि निफ्टी 73 अंकांनी चढून 18,200 च्या वर बंद झाला.

Share Market Opening 22 May 2023

Share Market Opening 22 May 2023

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती:

सेन्सेक्समधील 30शेअर्सपैकी 20 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि 10 शेअर्स घसरत आहेत. याशिवाय NSE निफ्टीचे 32 शेअर्स तेजीत आहेत. 18 शेअर्समध्ये घसरण आहे.

सेक्टोरल इंडेक्समध्ये आज निफ्टीच्या मीडिया आणि खाजगी बँक क्षेत्रांव्यतिरिक्त, इतर सर्व शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.

आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक 0.79 टक्के वाढ दिसून येत आहे. आरोग्य सेवा निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वर आहे. फार्मामध्ये 0.55 टक्के आणि पीएसयू बँकेत 0.44 टक्के तेजीसह व्यवहार होत आहेत.

अदानी शेअर्समध्ये आज तेजी :

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळत आहे आणि या आधारावर समूहाची सुरुवात चांगली झाली आहे. अदानी शेअर्स 5-5 टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वधारले:

एनटीपीसी सुमारे 2 टक्क्यांनी आणि पॉवर ग्रिड 1.33 टक्क्यांनी वधारत आहे. इन्फोसिसने सुमारे 1 टक्क्यांनी आणि विप्रोची ताकद 0.87 टक्क्यांनी वाढली आहे.

सन फार्मा 0.85 टक्के, टेक महिंद्रा 0.84 टक्के आणि एलअँडटी देखील 0.84 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सचे हे शेअर्स आज घसरले:

इंडसइंड बँक अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. भारती एअरटेल 0.36 टक्क्यांनी, नेस्ले 0.30 टक्क्यांनी आणि एशियन पेंट्स 0.29 टक्क्यांनी घसरत आहे.आयसीआयसीआय बँक 0.17 टक्क्यांनी आणि अॅक्सिस बँक 0.16 टक्क्यांनी घसरत आहे.