Share Market Opening : 4 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, शेअर बाजारात पुन्हा तेजी, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला.
share market
share market sakal

Share Market Opening On 24th February 2023 : चार दिवसांच्या घसरणीसह बंद झाल्यानंतर, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला.

BSE सेन्सेक्स 253 अंकांच्या वाढीसह 59,859 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 80 अंकांच्या वाढीसह उघडला. बँक निफ्टी बाजारात तेजीत आहे.

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी होत आहे. माध्यम क्षेत्राच्या शेअर्समध्ये घट झाली आहे.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजी आहे. बँक निफ्टी वेगाने व्यवहार करत आहे. निर्देशांकात 0.75 टक्क्यांची उसळी आहे. निफ्टी आयटी देखील 0.72 टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहे.

share market
Bank Share Returns : पडझडीच्या काळात 'हे' बँक शेअर्स देतील दमदार परतावा

'या' शेअर्समध्ये तेजी :

आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक 1.33%, एसबीआय 1.23%, बजाज फिनसर्व्ह 1.18%, कोटक महिंद्रा 0.93%, इन्फोसिस 0.88%, एनटीपीसी 0.88%, भारती एअरटेल 0.71%, विप्रो 0.65%, फिनसर्व्ह बँक 0.60%, Axis 0.60% एचसीएल टेक 0.62 टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहे.

'या' शेअर्समध्ये घसरण :

आजच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा 0.86 टक्के, आयटीसी 0.50 टक्के, टाटा स्टील 0.49 टक्के, टायटन कंपनी 0.47 टक्के, टाटा मोटर्स 0.40 टक्के, मारुतु सुझुकी 0.29 टक्क्यांनी घसरत आहे.

share market
जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

बाजारातील तेजीचे कारण जागतिक बाजारपेठेतील तेजी हे आहे. गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीत बंद झाला. त्यामुळे आशियाई बाजारांमध्ये तेजी आहे, त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com