
Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 61,750 वर, 'या' शेअर्समध्ये...
Share Market Opening 25 May 2023: शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह उघडला. सध्या BSE सेन्सेक्स किंचित तेजीसह 61800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीही 18,300 च्या जवळ आहे. मेटल सेक्टरमध्ये जोरदार विक्री होत आहे.
ब्रिटानियाचा शेअर निफ्टीमध्ये सुमारे 4 टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत आहे, जो निर्देशांकातही सर्वाधिक वाढणारा आहे. याशिवाय पॉवर ग्रिड आणि बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये तेजी आहे.
टाटा मोटर्स आणि हिंदाल्कोचे शेअर्स 1.25 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान करणारे आहेत.
याआधी बुधवारी भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले होते. BSE सेन्सेक्स 208 अंकांनी घसरून 61,773 वर आणि निफ्टी 62 अंकांनी घसरून 18,285 वर बंद झाला.

Share Market Opening 25 May 2023
जागतिक बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. Dow Jones Industrial Average 0.77 टक्के, S&P 500 0.73 टक्के, तर टेक-केंद्रित Nasdaq Composite Index 0.61 टक्क्यांनी खाली आला.
आजच्या व्यवहारात आशियाई बाजारात संमिश्र परिणाम दिसून येत आहेत. जपानचा निक्केई 0.55 टक्क्यांनी वर आहे, तर टॉपिक्स निर्देशांक 0.30 टक्क्यांनी घसरला आहे.
हाँगकाँगचा हँगसेंग सुमारे 1.60 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी किंचित वरच्या ट्रेंडने व्यवहार करत आहे.
गौतम अदानी ग्रुपचे एनडीटीव्ही आणि अदानी पॉवर वगळता, गौतम अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 3% ने घसरले आहेत.
गुरुवारी सकाळच्या व्यापारात अदानी विल्मार लिमिटेडला सर्वात मोठा तोटा झाला तर अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसमध्येही घसरण दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, एसबीआय कार्ड्स, आयसीआयसीआय बँक, आयआरसीटीसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, पतंजली. फूड्स, टाटा मोटर्स या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.