Share Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्स 400 अंकांनी वर, बँक निफ्टीचा विक्रमी उच्चांक|Share Market Opening latest updates today 29 May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्स 400 अंकांनी वर, बँक निफ्टीचा विक्रमी उच्चांक

Share Market Opening 29 May 2023: आज भारतीय शेअर बाजारात तेजीसह व्यवसाय होताना दिसत आहे आणि सेन्सेक्स 300 अंकांच्या तेजीसह उघडला. बँक निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

आज बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग 44276 च्या अंकांवर उघडला आहे आणि पहिल्यांदाच सुरुवातीच्या ट्रेडमध्येच 44300 चा टप्पा ओलांडला आहे. 14 डिसेंबर 2022 नंतर बँक निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.

भारतीय शेअर बाजारात आज BSE सेन्सेक्स 299.85 अंकांच्या म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 62,801.54 वर उघडला आणि त्यात आणखी वाढ होत आहे. याशिवाय, NSE चा निफ्टी 119.80 अंकांच्या म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 18,619.15 वर उघडला आहे.

बँक निफ्टीत नवीन विक्रमी उच्चांक:

बँक निफ्टीने प्री-ओपनमध्ये विक्रमी उच्चांक गाठला आणि 44276 वर स्थिरावला. बाजार उघडण्याच्या वेळी, बँक निफ्टी 258.80 अंकांच्या म्हणजेच 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 44276 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत बँक निफ्टीने 320 अंकांची तेजी नोंदवली आहे आणि आज पहिल्यांदाच बँक निफ्टीने 44300 ची पातळी ओलांडली आहे जे बँक क्षेत्रासाठी तेजीचे संकेत देत आहेत.

Share Market Opening 29 May 2023

Share Market Opening 29 May 2023

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती:

सकाळी 9:28 वाजता सेन्सेक्समध्ये सुमारे 500 अंकांची तेजी दिसून येत होती आणि तो 491.13 अंकांच्या म्हणजेच 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 62,992.82 वर आला आहे. आज सेन्सेक्स पुन्हा 63000 च्या पातळीवर पोहोचू शकतो हे स्पष्ट आहे.

NSE चा निफ्टी 131.60 अंक किंवा 0.71 टक्क्यांच्या वाढीसह 18,630.95 वर आला आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स तेजीत आहेत आणि केवळ 2 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 41 शेअर्स वाढीचे तेजी दाखवत आहेत आणि केवळ 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ:

M&M मध्ये सुमारे 3 टक्के, HDFC मध्ये 1.76 टक्के आणि IndusInd Bank मध्ये 1.66 टक्के दिसून येत आहेत. बजाज फिनसर्व्ह 1.45 टक्के आणि एचडीएफसी बँक 1.39 टक्क्यांनी वधारत आहे. कोटक महिंद्रा बँक 1.01 टक्क्यांनी वधारत आहे.

याशिवाय भारती एअरटेल, नेस्ले, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, रिलायन्स, बजाज फायनान्स, एल अँड टी, आयटीसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, विप्रो, एचयूएल, एनटीपीसी, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एशियन पेंट्स, एचयूएल, मारुती सुझुकी यासोबतच टाटा स्टील आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्समध्ये एचसीएल टेक, सन फार्मा आणि पॉवरग्रिडच्या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 3 शेअर्समध्ये घसरण होत आहे.