Share Market : 6 महिन्यात 'या' बँकेच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; आणखी तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 6 महिन्यात 'या' बँकेच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; आणखी तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास

Share Market : साऊथ इंडियन बँक (South Indian Bank) ही देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक आहे. बँँकेचे मुख्यालय केरळच्या त्रिशूरमध्ये आहे. साऊथ इंडियन बँकेचे मार्केट कॅप सुमारे 3,091 कोटी आहे.

बँकेने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. बँकेच्या शेअर्समध्ये सुरू असलेली तेजी थांबणार नाही आणि ती सध्याच्या पातळीपासून सुमारे 40% ने वाढू शकते असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे.

साऊथ इंडियन बँकेने आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे चांगला परिणाम पाहायला मिळात आहे.

साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स एनएसईवर सध्या 18.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 101% मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 9 महिन्यांत त्याचे शेअर्स सुमारे 135% वाढले आहेत.

नुकत्याच संपलेल्या डिसेंबर तिमाहीत साउथ इंडियन बँकेला 102.75 कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेला 50.31 कोटीचा तोटा झाला होता.

साऊथ इंडियन बँकेने काही दिवसांपासून '6C' ची रणनीती अंमलात आणली होती. या अंतर्गत, बँकेने CASA, कॉस्ट रेश्यो, कस्टमर फोकस, कॅपिटल, कंप्लायन्स आणि कॉम्पिटन्सी बिल्डिंगवर फोकस केले आहे.

बँकेतील हे सर्व बदल बँकेचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर मुरली रामकृष्णन यांच्या येण्यानंतर झाले आहे, त्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.