
Multibagger Stock: 7 रुपयांचा शेअर तब्बल 806 रुपयांवर, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडेंडची केली घोषणा
Share Market Investment Tips: गुजरातची फार्मा कंपनी गुजरात थेमिस बायोसिनच्या (Gujarat Themis Biosyn) शेअर्समध्ये सध्या चांगली खरेदी होताना दिसत आहे.
मागच्या काही वर्षांचा विचार केल्यास या शेअरने गेल्या 11 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना 11400% चा मजबूत परतावा दिला आहे. आता ही कंपनी स्टॉक स्प्लिट आहे. त्याचे शेअर्स सध्या बीएसईवर 3.16 टक्क्यांच्या वाढीसह 806 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
मार्च तिमाही निकाल जाहीर झाल्यामुळे, कंपनीने 1:5 च्या प्रमाणात शेअर्स स्प्लिटची घोषणा केली आहे. 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा प्रत्येक शेअर 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूमध्ये स्प्लिट केला जाईल. शिवाय कंपनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी डिव्हिडेंडही देणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्सवर 20 टक्के म्हणजेच 1 रुपया डिव्हिडेंड मंजूर केला आहे. कंपनी डिव्हिडेंडवर 1,45,28,702 कोटी रुपये खर्च करेल. हा डिव्हिडेंड 9 सप्टेंबर 2023 रोजी किंवा नंतर दिला जाईल आणि यासाठी रेकॉर्ड डेट 1 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे .
गुजरात थेमिस बायोसिनचे शेअर्स 27 जानेवारी 2012 रोजी अवघ्या 7 रुपयांना मिळत होते. आता तो 806 रुपयांवर आहे, याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 11 वर्षांत 11400 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि केवळ 87,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तो कोट्यधीश झाला आहे.
त्यांच्या शेअर्सनी कमी कालावधीतही चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 21 डिसेंबर 2022 रोजी तो 376.10 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.
यानंतर, 19 डिसेंबर 2022 रोजी तो सहा महिन्यांत 145 टक्क्यांनी वाढून 921.05 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला. पण शेअर्सची ही तेजी थांबली आणि सध्या तो या उच्चांकावरून 12 टक्क्यांपेक्षा जास्त डिस्काउंटवर मिळत आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.