Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! 'या' पेनी स्टॉकने 6 महिन्यात पैसे केले दुप्पट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! 'या' पेनी स्टॉकने 6 महिन्यात पैसे केले दुप्पट

Share Market Investment Tips : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक ही जोखमीची मानली जाते. पण काही पेनी स्टॉक असे आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार रिटर्न देत मालामाल केले आहे.

अशाच स्टॉक्समध्ये साउथ इंडियन बँकेची (South Indian Bank) गणना होते. या शेअर्सने शॉर्ट टर्ममध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.

गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 100% नफा दिला आहे, याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स सध्या 16.70 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

जास्त व्याजदरांमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्र त्याच्या एनआयएममध्ये सुधारणा करेल अशी शक्यता असल्याचे जीसीएल ब्रोकिंगचे सीईओ रवी सिंघल म्हणाले आहे. त्यामुळे येत्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते.

येत्या काळात बँकिंग क्षेत्रात वाढ अपेक्षित असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत. शेअरला 12 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे आणि जर तो 20 रुपयांवर टिकला तर तो 25 रुपयांवरही जाऊ शकतो.

6 महिन्यांपूर्वी या खासगी बँकेच्या एका शेअरची किंमत 8.45 रुपये होती, ती आता 16.70 रुपये झाली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 2 लाख झाले असते.

मात्र, गेल्या एका महिन्यात त्याचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, यावर्षी हा स्टॉक आतापर्यंत 13 टक्क्यांनी घसरला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.