Bonus Share : एका वर्षात 260% वाढ, आता बोनस शेअरची घोषणा...

याचा अर्थ कंपनी प्रत्येक 3 शेअर्समागे 2 नवीन शेअर्स जारी करेल.
Bonus Share
Bonus Sharesakal

Bonus Share : स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट (Sprayking Agro Equipment) हा अशा काही स्टॉक्सपैकी एक आहे ज्याने यावर्षी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीने शुक्रवारी बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीचे बोर्ड पात्र भागधारकांना 3:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करेल असे स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ कंपनी प्रत्येक 3 शेअर्समागे 2 नवीन शेअर्स जारी करेल. (Sprayking Agro Equipment stock have 260 percent and bonus share declared)

स्प्रेकिंग ऍग्रो शेअर्सनी शुक्रवारी 5% अप्पर सर्किट गाठून 102.18 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 61.29% वाढ झाली आहे. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीपासून, या स्टॉकने 144.45% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 262.98% ची बंपर वाढ झाली आहे.

Bonus Share
Bonus Share : पैसाच पैसा! 'या' कंपन्या देणार गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे गिफ्ट

बोनस शेअर म्हणजे काय ?

साधारणपणे, एखादी कंपनी आपल्या भागधारकांना इंसेंटिव्ह म्हणून बोनस शेअर्स जारी करते. त्याला अतिरिक्त शेअर्सही म्हणता येईल. या बोनस शेअरचे प्रमाण कंपनीचे बोर्ड ठरवते. बोनस शेअर्स अंतर्गत 3 महत्त्वाच्या तारखा आहेत. ज्यात रेकॉर्ड डेट, एक्स डेट,आणि इश्यू डेट या आहेत.

Bonus Share
Diwali Bonus : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर २१ दिवसांनी बोनस

याचा अर्थ असा की बोनस शेअर्स फक्त रेकॉर्ड डेटनुसार कंपनीचे शेअर्स धारण केलेल्यांना दिले जातात, तर एक्स-बोनस सामान्यतः रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी असते. बोनस शेअर्ससाठी पात्र होण्यासाठी, गुंतवणूकदाराने कंपनीचा स्टॉक एक्स-डेटच्या किमान एक किंवा दोन दिवस आधी घेतला जाणे आवश्यक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com