Stock Market Holiday : BSE, NSE सह सर्व बाजार आज राहणार बंद; जाणून घ्या बाजाराचे संपूर्ण वेळापत्रक |Stock market holiday NSE, BSE to remain closed today on Maharashtra Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Stock Market Holiday : BSE, NSE सह सर्व बाजार आज राहणार बंद; जाणून घ्या बाजाराचे संपूर्ण वेळापत्रक

Stock Market Holiday Today:  तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. सोमवारी म्हणजेच 1 मे रोजी बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. कारण आज बाजाराला सुट्टी आहे.

सोमवारी स्टॉक मार्केट एक्सचेंजमध्ये कोणताही व्यवहार होणार नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर उपलब्ध माहितीनुसार, NSE आणि BSE हे दोन्ही प्रमुख एक्सचेंज महाराष्ट्र दिनानिमित्त आज बंद राहणार आहेत. आता 2 मे रोजी बाजारात ट्रेडिंग होईल.

एक्सचेंजनुसार, इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंट बंद राहतील. यासह चलन डेरिव्हेटिव्ह विभाग आणि व्याजदर डेरिव्हेटिव्ह विभाग देखील 1 मे रोजी बंद राहतील.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) देखील सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत व्यापारासाठी बंद राहील.

Stock Market Holiday List

Stock Market Holiday List

स्टॉक मार्केट सुट्टी:

BSE वेबसाइट https://www.bseindia.com/ ने कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि SLB विभागांसाठी 15 सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

सलग 7 व्या दिवशी शेअर बाजार वधारला:

शुक्रवारी सलग सातव्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 463 अंकांनी वाढून 61,112 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 150 अंकांच्या वाढीसह 18,065 वर बंद झाला. एका आठवड्यात निफ्टी सुमारे अडीच टक्क्यांनी वाढला.

याच कालावधीत, निफ्टीमधील टाटा कंज्यूमरचा शेअर 9% ने वाढला, जो निर्देशांकातील सर्वोच्च कामगिरी करणारा होता. तर FMCG क्षेत्रातील दिग्गज HUL चा स्टॉक एका आठवड्यात 1.8% ने खाली आला.

मे महिन्यात शेअर बाजाराला एकच सुट्टी असून आज ती महाराष्ट्र दिनानिमित्त आहे. यानंतर दीर्घकाळ शेअर बाजारात साप्ताहिक सुट्टीशिवाय दुसरी सुट्टी नाही. यानंतर थेट 28 मे रोजी बकरीईदनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल.

28 जूनला बकरीईदनंतर जुलैमध्ये शेअर बाजाराला सुट्टी नाही. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल.