Sun Pharma : सन फार्मा कंपनीचा डेटा चोरीला गेल्यानंतर कंपनीचे मोठे वक्तव्य

देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सन फार्माच्या सायबर हल्ला करण्यात आला होता.
Sun Pharma says revenue may decline as operations hit due to ransomware attack
Sun Pharma says revenue may decline as operations hit due to ransomware attack Sakal

Sun Pharma : देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सन फार्माच्या सायबर हल्ला करण्यात आला असून या सायबर हल्यात काही डेटाही चोरीला गेला आहे. कंपनीनेने याबाबत खुलासा केला आहे. माहितीनुसार, नुकत्याच आयटी सिस्टमवर झालेल्या व्हायरसच्या हल्ल्यात कंपनीशी संबंधित अधिक डेटा चोरला.

त्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला असून काही व्यवसायांच्या महसुलावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. हल्ल्यामुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट होण्याची अपेक्षा आहे. (Sun Pharma says revenue may decline as operations hit due to ransomware attack)

2 मार्च रोजी, फार्मा कंपनीने सांगितले की घटना घडली आणि त्याचा परिणाम कंपनीच्या संपतीवर झाला आहे. या हल्ल्यामागे एका रॅन्समवेअर गटाचा हात होता, असे सन फार्माने सांगितले.

“आयटी सिस्टमवर झालेल्या घटनेच्या परिणामामध्ये काही फाइल सिस्टमचे उल्लंघन आणि विशिष्ट कंपनी डेटा आणि वैयक्तिक डेटाची चोरी यांचा समावेश आहे,” असे रविवारी उशिरा स्टॉक एक्सचेंजमध्ये माहिती देताना सांगण्यात आले.

Sun Pharma says revenue may decline as operations hit due to ransomware attack
Banking Crisis : अमेरिकेत बँकिंग संकट, भारतात Reliance-TCS चे शेअर्स का घसरत आहेत?

मुंबईस्थित फार्मा कंपनीने सांगितले की त्यांनी नेटवर्क वेगळे केले आहे त्यावर काम चालू आहे. या उपायांमुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी, आमच्या काही व्यवसायांमध्ये महसूल कमी होण्याची अपेक्षा आहे.

सन फार्मा म्हणाली की ते या घटनेचे इतर संभाव्य प्रतिकूल परिणाम सांगू शकत नाही, ज्यात अतिरिक्त माहिती सुरक्षा, विमा संरक्षण, व्यवस्थापन, खटला इत्यादींसाठीचा मोठा खर्च वाढू शकतो सन फार्माचे सोमवारी बीएसईवर शेअर्स 0.44 टक्क्यांनी वाढून सकाळी 10 वाजेपर्यंत 977 रुपयांवर व्यवहार करत होता.

Sun Pharma says revenue may decline as operations hit due to ransomware attack
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com