Tata Group: टाटा ग्रुपची 'ही' कंपनी घेणार 10 हजार कोटींचे कर्ज? जाणून घ्या काय आहे योजना|Tata Capital in talks with lenders to raise Rs 10,000 crore via debt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Group

Tata Group: टाटा ग्रुपची 'ही' कंपनी घेणार 10 हजार कोटींचे कर्ज! जाणून घ्या काय आहे योजना

Tata Capital: टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटल 10,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा विचार करत आहे. टाटा कॅपिटल या कर्जाद्वारे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाबाबत धोरण आखत आहेत.

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या बोर्डाने टीसीएफएसएलच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. कर्ज घेण्याबाबत टाटा कॅपिटलकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, टाटा कॅपिटल या कर्जाद्वारे आपला ताळेबंद (Balance Sheet) वाढवण्याचा विचार करत आहे. तसेच, कंपनीला किरकोळ कर्ज धोरण अवलंबायचे आहे.

कंपनी कर्ज म्हणून घेतलेल्या पैशाचा वापर गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज देण्यासाठी करेल. रिझर्व्ह बँकेच्या मते, टाटा कॅपिटल ही बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आहे.

टाटा सन्सनेही टाटा कॅपिटलमध्ये गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये टाटा सन्सने टाटा कॅपिटलमध्ये 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

आर्थिक वर्ष 2020 मध्ये, पुन्हा एकदा टाटा सन्सने टाटा कॅपिटलमध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. टाटा कॅपिटल व्यतिरिक्त टाटा मोटर्स फायनान्स देखील कर्ज देते. मात्र, ही कंपनी केवळ वाहने आणि डीलर्सनाच वित्तपुरवठा करते.

जानेवारी 2022 मध्ये, टाटा सन्सने SBI कडून 10,000 कोटी रुपये आणि BoB कडून 4.25% व्याजदराने 5,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले.

एअरलाइन्स नवीन विमानांमध्ये गुंतवणूक करणार:

एअरलाइन्स नवीन विमानांमध्ये गुंतवणुकीची योजना आखत आहेत. आकडेवारीनुसार, मार्च 2022 अखेर एअर इंडियाचा तोटा 93,473 कोटी रुपये होता. टाटांच्या अखत्यारीतील विमान कंपनीने पुढील पाच वर्षांत 113 विमानांच्या ताफ्यात तिप्पट वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.