Tata Group Trent : ट्रेंटच्या शेअर्सची गगनभरारी, आणखी बक्कळ कमाईची संधी... | Share Market News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Group Trent

Tata Group Trent : ट्रेंटच्या शेअर्सची गगनभरारी, आणखी बक्कळ कमाईची संधी...

टाटा ग्रुपच्या ट्रेंटने (Trent) गुंतवणूकदारांना झटपट कोट्यधीश बनवले आहे. ट्रेंटचे शेअर्स अस्थिर बाजारातही चांगले परफॉर्म करत आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांनी ट्रेंटचे शेअर्स आताच्या किंमतीपासून आणखी 16 टक्क्यांनी वाढू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या ट्रेंटचे शेअर्स 1336.85 रुपयांवर आहेत. ट्रेंटचे संपूर्ण मार्केट कॅप 47,523.34 कोटी रुपये आहे. (Tata Group Trent have earning opportunity share are in growth share market news)

ट्रेंटचा महसूल वार्षिक 53.65 टक्क्यांनी वाढून 2303 कोटीवर गेला आणि नेट प्रॉफीट 19.55 टक्क्यांनी वाढून 167 कोटी रुपयांवर गेला. यात पुढे वाढ दिसत असल्याचे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी म्हटले आहे.

ब्रोकरेज बोनान्झा आणि मोतीलाल ओसवाल यांनी आगामी तिमाहीत चांगल्या वाढीची शक्यता, स्टोअरच्या विस्तारावर फोकस आणि स्टार बाजार व्यवसायात सुधारणयाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे. मोतीलाल ओसवाल यांनी 1500 रुपये आणि बोनान्झा यांनी 1584 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

ट्रेंटचे शेअर्स 11 एप्रिल 2003 रोजी 13.34 रुपयांवर होते, जे आता 1342.80 रुपयांवर आहेत. याचा अर्थ ट्रेंटमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक 20 वर्षांत 1 कोटी झाले आहे. गेल्या वर्षी 12 मे 2022 रोजी त्याची किंमत 983.70 रुपये होती, जी एका वर्षातील नीचांकी आहे.

यानंतर, पुढील 6 महिन्यांत ते 60 टक्क्यांनी वाढले आणि 2 नोव्हेंबर 2022 रोजी 1571 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. सध्या, त्याचे शेअर्स विक्रमी पातळीपासून 15 टक्क्यांनी घसरले आहेत, पण यात अजूनही वाढीला वाव असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.