
Gautam Adani : गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानींनी दिला राजीनामा, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Gautam Adani Latest News : गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी तीन ऑस्ट्रेलियन कोळसा खाण कंपन्यांचा राजीनामा दिला आहे. कारमाइकल रेल आणि पोर्ट सिंगापूर, कारमाइकल रेल सिंगापूर आणि अॅबॉट पॉइंट टर्मिनल या कंपन्यांमधून राजीनामा दिला.
अदानी समूहाने राजीनाम्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. अदानी समूहावर सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी हे राजीनामे आले आहेत.
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांनी ऑस्ट्रेलियातील कोळसा खाण, कारमाइकल रेल आणि पोर्ट सिंगापूर, कारमाइकल रेल सिंगापूर आणि अॅबॉट पॉइंट टर्मिनल संबंधित तीन कंपन्यांच्या संचालकपदावर ते काम करत होते.
अदानी समूह आणि विनोद अदानी यांच्यात व्यवहार झाला होता का? याचा सेबी तपास करत आहे. अदानी समूहाच्या प्रतिनिधीने सांगितले की, विनोद अदानी यांचा कारमाइकल खाण किंवा त्याच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये कोणताही सहभाग नाही.
24 जानेवारीच्या हिंडेनबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की विनोद अदानी यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सचे व्यवहार करून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढवल्या होत्या.
ब्लूमबर्गने सांगितले की अदानी ग्लोबलच्या दुबई ऑफिसमध्ये त्यांची केबिन आहे, जिथे ते दररोज दोन किंवा तीन तास काम करतात.
विनोद अदानी यांचा अदानी समूहात मोठा हिस्सा आहे. अदानी समूहाच्या शेअरच्या किंमती वाढवण्यासाठी हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
विनोद अदानी यांची एकूण संपत्ती किती आहे?
अदानी समूहात विनोद अदानी यांची हिस्सेदारी आहे. अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्या विनोद अदानी यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. IIFL Hurun India Rich List 2022 नुसार, ते भारतातील सर्वात श्रीमंत NRI आहेत.
या यादीनुसार, सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती 1,69,000 कोटी रुपये आहे. फोर्ब्स 2023 नुसार, विनोद अदानी यांच्याकडे 10.1 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.