Adani Block Deals : संकट काळात गौतम अदानींना 15,446 कोटींची मदत करणारे राजीव जैन कोण आहेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Jain

Adani Block Deals : संकट काळात गौतम अदानींना 15,446 कोटींची मदत करणारे राजीव जैन कोण आहेत?

Adani Block Deals : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अहवाल अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. पण गेल्या एका आठवड्यापासून अदानी समूहाचे काही शेअर्स तेजीत आहेत.

कारण अडचणीत सापडलेल्या गौतम अदानींना राजीव जैन यांनी मदत केली आहे. अमेरिकेत असलेल्या मालमत्ता व्यवस्थापक GQG Partners (GQG) ने 4 समूह कंपन्यांमधील 15,446 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला असताना हा करार झाला आहे.

GQG ने 4 अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 3,87,01,168 शेअर्सच्या बदल्यात 5,460 कोटी रुपयांचा सौदा केला आहे. (Who is GQG Partners' Rajiv Jain, the man who bought Adani shares worth Rs 15,446 cr)

अदानी पोर्ट आणि SEZ च्या 8,86,00,000 शेअर्सच्या बदल्यात 5,282 कोटी रुपये घेतले आहेत. अदानी ट्रान्समिशनला 2,84,00,000 शेअर्ससाठी 1,898 कोटी रुपये आणि अदानी ग्रीन एनर्जीला 5,56,00,000 शेअर्ससाठी 2,806 कोटी रुपयांच्या डीलमध्ये देण्यात आले आहेत.

गौतम अदानी या डीलमधून या गुंतवणुकीचा वापर कर्ज कमी करण्यासाठी आणि तरलता वाढवण्यासाठी करणार आहेत.

कोण आहेत राजीव जैन?

गेल्या तीन-चार दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, या GQG कंपनीसोबत 15446 रुपयांची मेगा डील लाइफलाइन म्हणून काम करत आहे.

GQG पार्टनर्सचे मालक राजीव जैन यांचा जन्म भारतात झाला आहे. त्यांनी मियामी विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकेमध्ये गेले. 1994 मध्ये व्होंटोबेल कंपनीमध्ये रुजू झाले, तर 2022 मध्ये स्विस फर्मच्या सीआयओपदी विराजमान झाले.

सध्या ते राजीव जैन हे GQG भागीदार धोरणांसाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून काम करतात. विशेष म्हणजे राजीव जैन यांनी जून 2016 मध्ये ही कंपनी सुरू केली होती.

2023 मध्ये त्यांच्या कंपनीला मॉर्निंगस्टार फंड मॅनेजर ऑफ द इयरचा सन्मान मिळाला. इक्विटी सौद्यांमध्ये ते अनुभवी म्हणून ओळखले जातात. त्यांची हिस्सेदारी ITC, HDFC, RIL, ICICI, SBI, Infosys, Tata सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये आहे.