WPIL Share अप्पर सर्कीटमध्ये; नव्या ऑर्डरमुळे शेअर्समध्ये वाढ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPIL Share

WPIL Share अप्पर सर्कीटमध्ये; नव्या ऑर्डरमुळे शेअर्समध्ये वाढ...

WPIL Share : डब्ल्यूपीआयएलचे (WPIL) शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 2,038.85 रुपयांवर पोहोचले. स्टॉकचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे. कंपनीला 1,225 कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी मध्य प्रदेश जल निगम लिमिटेडकडून लेटर ऑफ एक्सेप्टंसी (LOA) मिळाल्याचे कंपनीने सांगितले. याआधी 21 फेब्रुवारी 2023 रोजी स्टॉकने 1,949 रुपयांच्या मागील उच्चांक गाठला होता. (WPIL Share in upper circuit due to new order share market)

डब्ल्यूपीआयएलच्या स्टॉकने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी मागच्या एका वर्षात हा स्टॉक 130 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात, स्टॉकला चांगल्या डिसेंबर तिमाही निकालांमुळे चांगला सपोर्ट मिळला. कंपनीने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 83.70 कोटी रुपयांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स नोंदवला होता.

डब्ल्यूपीआयएल कंपनी पंपांच्या पुरवठ्यापासून टर्नकी प्रोजेक्ट्सच्या बांधकामापर्यंत उपाय प्रदान करण्याच्या व्यवसायात आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 106 टक्क्यांनी वाढून 507.2 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, तिमाहीत एबिटा मार्जिन 732 बीपीएसने वाढून 20.9 टक्क्यांवर पोहोचला.

कंपनीच्या महसुलातील वाढ ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि टर्नकी प्रोजेक्ट बिझनेसमुळे झाली. त्याचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय वार्षिक 64 टक्क्यांनी वाढून 239.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, टर्नकी प्रोजेक्टमधून मिळणारा महसूल वार्षिक 180 टक्क्यांनी वाढून 254.3 कोटी झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock