धरणाच्या पाण्यासाठी अर्ज मागविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी- आंबडपाल पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील कुडाळ तालुक्‍यातील दाभाचीवाडी, ओरोस, तळेवाडी, चोरगेवाडी, हातेरी, निळेली, पावशी, पुळास, सावंतवाडी तालुक्‍यातील सनमटेंब, माडखोल, कारिवडे, वाफोली, आंबोली, शिरवळ, वेंगुर्ले तालुक्‍यातील आडेली, वैभववाडी तालुक्‍यातील तिथवली, देवगड तालुक्‍यातील शिरगाव, मालवण तालुक्‍यातील धामापूर, कणकवली तालुक्‍यातील लोरे, हरकूळ, ओझरम, ओसरगाव या लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये पाणीसाठा झाला आहे.

कोकण हंगाम 2016-17 सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी याचा लाभ घ्यावा. या योजनेच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी सिंचनासाठी पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 मध्ये दोन प्रतित भरून संबंधित सहायक अभियंता, पाटबंधारे उपविभाग, सावंतवाडी, कणकवली यांच्याकडील संबंधित शाखेमध्ये 15 डिसेंबर 2016 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल यांनी केले आहे.

Web Title: application for dam water