क्रिकेटचे ‘गुलाबी चित्र’!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

विराट कोहलीने बांगलादेश-विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक केल्यावर तो प्रकाशझोतातील सामन्यातील भारताचा पहिला शतकवीर झाला असल्याचे समाजमाध्यमांतून सांगितले जाऊ लागले; पण `गुलाबी चेंडू’वरील पहिला भारतीय शतकवीर कोहली नव्हे, तर राहुल द्रविड आहे.

विराट कोहलीने बांगलादेश-विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक केल्यावर तो प्रकाशझोतातील सामन्यातील भारताचा पहिला शतकवीर झाला असल्याचे समाजमाध्यमांतून सांगितले जाऊ लागले; पण `गुलाबी चेंडू’वरील पहिला भारतीय शतकवीर कोहली नव्हे, तर राहुल द्रविड आहे. प्रकाशझोतातील कसोटीची रंगीत तालीम करण्यासाठी ‘एमसीसी’ने घेतलेल्या सामन्यात द्रविडने दुसऱ्या डावात शतक केले होते. केरी पॅकरने समांतर क्रिकेट सुरू केले, त्या वेळी रंगीत पोशाखाचे क्रिकेट सुरू झाले होते; तसेच प्रकाशझोतातील लढतीही. अर्थात या प्रकाराच्या स्वीकारास भारताला विलंब झाला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाची कारकीर्द अविस्मरणीय ठरावी, यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी कोलकत्यास असल्याचा फायदा घेऊन त्यांनी हा प्रकाशझोतातील कसोटीचा प्रयोग अमलात आणला. त्यासाठी वातावरणनिर्मिती केली. या कसोटीसाठी नियमित कसोटीच्या खर्चापेक्षा एक कोटी जास्त खर्च केले. प्रकाशझोतातील कसोटीचा खर्च पारंपरिक कसोटीपेक्षा जास्त असतो. भारतीय मंडळ कसोटीच्या आयोजनासाठी अडीच कोटींचे साह्य करते. गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी प्रकाशझोत जास्त वेळ लागतात, त्याचा खर्च वाढतो, त्यामुळे या कसोटीसाठी जास्त मदतीची मागणी होऊ लागली आहे. विराट कोहलीने या कसोटीस काही सेकंदात मंजुरी दिली, असे सौरव गांगुली यांनी सांगितले होते; पण मायदेशातील प्रकाशझोतातील पहिली कसोटी सुरू होण्यास काही तास असताना कर्णधार विराट कोहलीने या प्रकारचा एखादाच प्रयोग चांगला, असे म्हणत सावध पवित्रा घेतला. भारताने ट्‌वेंटी- २० क्रिकेटलाही विरोध केला होता. आम्ही यापूर्वीच्या भारतीय मंडळावरील पदाधिकाऱ्यांनी मान्य केल्यामुळेच पहिल्या विश्वकरंडक ट्‌वेंटी -२० स्पर्धेत खेळत आहोत, असे सांगितले होते. मात्र, भारताने पहिली स्पर्धा जिंकली. त्या वातावरणाचा फायदा ‘आयपीएल’ला मिळाला आणि ‘आयपीएल’ लोकप्रिय लीग झाली. आता प्रकाशझोतातील कसोटीबाबतही हेच घडू शकते. कोलकतावासीयांचा या कसोटीस लाभलेला प्रतिसाद, कार्यालये सुटल्यावर मैदानात वाढलेली गर्दी उत्साहवर्धक प्रतिसादाची लक्षणे आहेत. दवाचा परिणाम, गुलाबी चेंडूशी जुळवून घेण्याचा प्रश्न यासारखे काही मुद्दे असले, तरी त्यावरही मार्ग निघेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on India Bangladesh in second test