ओडिशा : हत्तींसाठी चारा लागवड

odisha
odisha

ओडिशातील हत्ती आणि मानवांमधील संघर्ष थांबायला तयार नाही. हा संघर्ष २०१९-२० या वर्षात अधिक तीव्र होता. त्या काळात १०६ मानवी दुर्घटना घडल्या. अशा घटना रोखण्याचा प्रयत्न म्हणून चारा लागवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती वन्यजीव संवर्धकांनी दिली. 

अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत घुसणाऱ्या हत्तींना अटकाव करण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक हजार २५० एकर क्षेत्रावर चारा लागवड करण्यात येणार आहे. गेल्या दीड महिन्यात मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तींच्या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला. 

हत्तींमुळे आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ७५ झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. याउलट शिकार, विजेचा धक्का, अपघात आणि अन्य कारणांमुळे ७० हत्ती गेल्या वर्षात ठार झाले आहेत. 

अन्नाची टंचाई
चारा आणि पाण्याची टंचाई तसेच जंगलांभोवती वाढलेले पीक क्षेत्र यामुळे हत्तींना जंगलात खाद्यन्न मिळेनासे झाले आहे. यामुळे अन्नाच्या शोधात हत्ती मानवी वसाहतीत येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com