नक्षत्रांच्या गावातले गूज

सिसिलिया कार्व्हालो
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

एक छानसा ई-मेल आला होता. आजही नव्या स्वरूपात इसापनीती आपल्यासमोर येत असते, याची जाणीव झाली. माणसाची प्रवृत्ती चित्रित करण्यासाठी इसाप पशु-पक्षी, किडा-मुंगी यांचा वापर करीत असतो. म्हणजे कथांमध्ये पशु-पक्षी एकमेकांशी बोलतात. परंतु, त्यांचे बोलणे मात्र माणसाला ऐकू येत असते. कथा अशी ः एका मंदिराच्या छताच्या अडगळीत काही कबुतरे राहत होती. वार्षिक उत्सवावेळी त्या मंदिराचे नूतनीकरण सुरू झाले. तेव्हा ती कबुतरे चर्चच्या आडोशाला आली; तेथे आधी काही कबुतरे राहत होती. त्यांनी त्या नवीन आलेल्या कबुतरांना जागा करून दिली. नंतर ख्रिसमस आला. चर्चची रंगरंगोटी चालू झाली.

एक छानसा ई-मेल आला होता. आजही नव्या स्वरूपात इसापनीती आपल्यासमोर येत असते, याची जाणीव झाली. माणसाची प्रवृत्ती चित्रित करण्यासाठी इसाप पशु-पक्षी, किडा-मुंगी यांचा वापर करीत असतो. म्हणजे कथांमध्ये पशु-पक्षी एकमेकांशी बोलतात. परंतु, त्यांचे बोलणे मात्र माणसाला ऐकू येत असते. कथा अशी ः एका मंदिराच्या छताच्या अडगळीत काही कबुतरे राहत होती. वार्षिक उत्सवावेळी त्या मंदिराचे नूतनीकरण सुरू झाले. तेव्हा ती कबुतरे चर्चच्या आडोशाला आली; तेथे आधी काही कबुतरे राहत होती. त्यांनी त्या नवीन आलेल्या कबुतरांना जागा करून दिली. नंतर ख्रिसमस आला. चर्चची रंगरंगोटी चालू झाली. मग या सगळ्या कबुतरांनी तेथून स्थलांतर केले. एका मशिदीच्या घुमटाजवळ त्यांनी आसरा घेतला. मशिदीत आधीच ज्या कबुतरांचा निवास होता; त्यांनी मंदिर व चर्चच्या आडोशातून आलेल्या कबुतरांचे स्वागत केले. मग रमजान सुरू झाला; त्या मशिदीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू झाले, तेव्हा तेथून सगळी कबुतरे पुन्हा त्या मूळच्या जागेकडे परतली. एके दिवशी छताच्या आडोशाला राहणाऱ्या साऱ्या कबुतरांना एक वेगळेच चित्र दिसले. खाली असलेल्या बाजाराच्या चौकात त्यांना काहीतरी गोंधळ दिसला; तेव्हा एका पिलू कबुतराने आपल्या आईला विचारले, ‘हा आरडाओरडा कोण करत आहे?’ कबुतरी आई म्हणाली; की ती माणसे आहेत, आणि ती एकमेकांशी भांडताहेत.

‘कशासाठी ती भांडताहेत?’ पिलू म्हणाले. कबुतरी आई म्हणाली; ‘जे लोक मंदिरात जातात, त्यांना हिंदू म्हणतात. जे चर्चमध्ये जातात त्यांना ख्रिस्ती म्हणतात आणि जे मशिदीत जातात त्यांना मुसलमान म्हणतात. ती एकमेकांत आपल्या धर्माविषयी आणि धर्मस्थळांविषयी काही बोलताहेत आणि एकमेकांशी भांडताहेत.’

पिलू म्हणाले; ‘असे का? बघ ना आई, जेव्हा आपण मंदिरातल्या ठिकाणी राहत होतो; तेव्हा आपणाला कबुतरे असे म्हटले जात असे. आपण चर्चमध्ये राहायला गेलो; तेव्हाही आपल्याला कबुतरे असेच म्हटले गेले आणि मशिदीत राहायला गेलो; तेव्हाही आपल्याला कबुतरेच म्हटले गेले. मग माणसे... मंदिरात वा चर्चमध्ये वा मशिदीत जातात, तेव्हा त्यांना त्यांच्या धर्मावरून का बरे ओळखले जाते... ती तर माणसेच असतात ना? मग त्यांना माणसे असेच का नाही म्हटले जात?’

कबुतरी आई म्हणाली; ‘तू, मी आणि आपली सारी कबूतर मंडळी यांनी परमेश्‍वराचा अनुभव घेतलाय. म्हणूनच आपण एवढ्या उंचावर आनंदाने व शांततेने राहतो. या लोकांनी अजून देवाचा अनुभव घेतलेला नाहीये... म्हणूनच ते अजून आपल्यापेक्षा खाली; म्हणजे जमिनीवर राहतात व एकमेकांशी भांडतात.
नक्षत्रांच्या गावाच्या जवळपास राहणारे हे सारे पक्षी... त्यांनी सांगितलेले हे गूज... आपल्याही मनात गुंजन करीत राहील, निःसंदेह!

Web Title: cecilia carvalho's article