वारे कुणीकडे फिरणार?

वारे कुणीकडे फिरणार?

वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक पद्धतीमुळे अमेरिकी निवडणुकीतील निकालांचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते. यावेळची राजकीय परिस्थिती पाहता अनिश्चितता आणखीनच वाढली आहे, त्यामुळेच वारे कोणाच्या बाजूने फिरते हे पाहायचे.

अमेरिकेत ‘इलेक्टोरल कॉलेज’नावाची निवडणूक प्रणाली आहे, म्हणजे अमेरिकन नागरिकांना जरी असे वाटत असले, की ते त्यांच्या आवडत्या उमेदवाराला मतदान करत आहेत तरी तसे नसून ते वास्तविक त्यांच्या भागातील त्या पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधीला म्हणजेच ‘elector’ साठी मतदान करत असतात जो अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मत देतो. स्थानिक राज्यामध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराला जास्त मते मिळतात त्या राज्याचे सर्व इलेक्टोर्स ‘विनर टेक्स ऑल’ या न्यायाने एकाच पक्षाचे निवडले जातात व ते त्यांचे मत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला देतात. अमेरिकेत असे एकूण ५३८ इलेक्टोर्स आहेत. ज्याला अमेरिकेचा अध्यक्ष बनायचं असेल त्याला २७० इलेक्टोर्सच्या मतदानाची गरज असते. 

निवडणूक पुन्हा ‘त्या’ वळणावर
इलेक्टोर्स प्रत्येक राज्यानुसार बदलतात. त्यामुळे कधीकधी एखाद्या उमेदवाराला दुसऱ्यापेक्षा एकूण मते जास्त मिळूनही तो हरू शकतो. उदा.- आपण असे समजूयात की दोन शहरांच्या इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानाने अमेरिकेचा अध्यक्ष ठरणार आहे आणि ती शहरे म्हणजे वॉशिंग्टन आणि न्यू जर्सी. जर वॉशिंग्टनमध्ये बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा २५% जास्त मते  मिळाली; पण त्या शहराचे इलेक्टोर्स फक्त तीनच असतील आणि न्यू जर्सीत ट्रम्प यांना बायडेन यांच्यापेक्षा फक्त ०.५% मते जास्ती मिळाली, तरीदेखील त्या शहराचे इलेक्टोर १४ असतील तर बायडेन यांना ट्रम्प ह्यांच्यापेक्षा जास्त मते मिळूनदेखील न्यू जर्सीमध्ये ट्रम्प यांना फक्त ०.५% मत जास्त मिळाल्यामुळे ते सर्वांच्या सर्व १४ इलेक्टोरल मत ट्रम्प यांना मिळून १४ विरुद्ध ३ असा ट्रम्प यांचा विजय होईल. काही अपक्ष किंवा इतर पक्षीय उमेदवारही उभे राहतात; परंतु १.५% मत घेण्याच्या पुढे फार काही ते करू शकत नाहीत. पण मागील क्लिंटन विरुद्ध ट्रम्प निवडणुकीत अशाच इतर पक्षीय उमेदवारांनी घेतलेल्या थोड्या थोड्या मतांमुळे फ्लोरिडासारख्या राज्यात क्लिंटन यांचा थोडक्यात पराभव होऊन ट्रम्प जिंकले होते. अमेरिकेची निवडणूक आत्ता अशाच काहीशा वळणावर आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जनमत चाचण्या काय सांगतात?
द  ‘इकॉनॉमिस्ट’च्या फोरकास्ट मॉडेलच्या अंदाजानुसार ज्यो बायडेन इलेक्टोरल कॉलेज जिंकायची शक्यता ९६% आहे तर ट्रम्प ते जिंकायची शक्यता ४% आहे. असे जरी असले तरी इन्व्हेस्टर बिझिनेस डेली आणि TIPP (ज्यांचा २०१६ सालचा निवडणूकपूर्व अंदाज वास्तविकतेच्या सर्वात जवळ होता) ह्यांच्या एका अहवालानुसार २०१६ मध्ये ट्रम्प ह्यांना निवडणुकीच्या एक आठवडा आधी महत्त्वाच्या राज्यांमध्ये जेवढी पसंती होती, त्यापेक्षा जास्त पसंती या निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये दिसत आहे. या चाचणीनुसार बायडेन ५०%, तर ट्रम्प निवडून येण्याची शक्यता ४५.५% वर्तविण्यात आली आहे. ज्या पद्धतीने मागील निवडणुकीच्या काळात सर्व निवडणूकपूर्व अहवाल हिलरी क्लिंटन जिंकतील असे दाखवत होते, तरीदेखील ट्रम्प निवडून आले. त्याच पद्धतीने याहीवेळी सर्व निवडणूकपूर्व अंदाज बायडेन यांना जास्त मत मिळून जिंकतील असे दाखवत आहेत. मात्र हळूहळू ट्रम्प आणि बायडेन यांच्यातील दरी कमी होत  आहे.  निवडणुकीत एक तर बायडेन खूप मोठ्या फरकाने जिंकतील किंवा अचानकपणे ट्रम्प हे इलेक्टोरल कॉलेजच्या गुंतांगुंतीचा फायदा घेऊन परत निवडून येऊ शकतील. त्यामुळे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘वारे’ कोणाचे तरी नक्कीच फिरणार, अचानक वारे फिरून बायडेन हरू शकतात. बायडेन जिंकले तर परत मध्यममार्गी प्रवाह जगात येऊ शकतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com