सर्वोत्तम विद्यापीठांत दिल्ली विद्यापीठ पहिल्या दहांत 

पीटीआय
शुक्रवार, 9 जून 2017

नवी दिल्ली - देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. "क्‍यूएस' या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात 2018 साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत 481-491 स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत 801 ते 1000 असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ "पुणे विद्यापीठ' असा उल्लेख केलेला आहे.

नवी दिल्ली - देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. "क्‍यूएस' या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात 2018 साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत 481-491 स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत 801 ते 1000 असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ "पुणे विद्यापीठ' असा उल्लेख केलेला आहे. "ब्रिक्‍स' देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाला 131 ते 140 आणि आशियाई विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ 176 व्या स्थानावर दाखविले आहे. 

कर्नाटकच्या मनिपाल विद्यापीठाने खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमच देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या विद्यापीठाने देशात तेरावे स्थान मिळवताना 701-750 क्रमवारीत स्थान मिळवले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणासाठी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नसल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ""विद्यापीठाला 801 ते 1000 अशी क्रमवारी कशाच्या आधारे देण्यात आली, हे अनाकलनीय आहे. विद्यापीठाने "क्‍यूएस रॅंकिंग' सर्वेक्षणात भाग घेतलेला नव्हता. त्या कंपनीनेदेखील विद्यापीठाकडे माहिती मागितलेली नाही. तसेच विद्यापीठाचा उल्लेख केवळ "पुणे विद्यापीठ' केला आहे. त्यामुळे या निकालावर कोणतेही भाष्य करता येणार नाही. विद्यापीठाने आतापर्यंत फक्त "टाइम हायर एज्युकेशन रॅंकिंग'मध्ये भाग घेतला होता. त्यांना विद्यापीठाशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली होती. "क्‍यूएस रॅंकिंग'बाबत तसे घडलेले नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी "क्‍यूएस'ने संकेतस्थळावर दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये खूप तफावत आहे. विद्यापीठाविषयी सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही क्रमवारी देण्यात आली असेल तर त्याचा स्वीकार करता येणार नाही.' 

Web Title: delhi university marathi news sakal news