आखाती देशांशी संबंधांना नवी ‘ऊर्जा’

आखाती देशांशी संबंधांना नवी ‘ऊर्जा’

सौदी अरेबिया व संयुक्त अरब आमिराती (यूएई) या देशांशी संबंधांत सुधारणा घडविण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या घडामोडींचा परिचय करून देणारा लेख.

आखाती देशांशी संबंधांचा विचार करताना आठवते, ती ‘यूएई’च्या युवराजांची भारतभेट. युवराज मोहम्मद बिन जाएद अल नाह्यान नवी दिल्लीत विमानातून उतरले, तेव्हा राजनैतिक शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आलिंगन दिले. दोन वर्षांनंतर म्हणजे २०१९मध्ये सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचेही त्यांनी असेच स्वागत केले. वरकरणी हे दोन्ही प्रसंग स्वतंत्र दिसत असले, तरी त्यावरून भारत आणि आखाती देशांतील संबंधांमध्ये घडून आलेले मूलभूत परिवर्तन सूचित होते. परस्परांप्रती मैत्र, आदर दिसतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्कृतीचे समान धागे
आखाती देश आणि भारत यांच्यात कित्येक शतकांपासून जोपासलेला वारसा आणि संस्कृतीचे समान धागे, दोन्ही देशांतील नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातही सहजरित्या दिसून येतात. आमच्या बऱ्याच नागरिकांसाठी श्रद्धास्थान असणारी मक्का आणि मदिना ही पवित्र स्थळे आखाती देशांमध्ये आहेत, त्याशिवाय पुराणे, भाषा, धर्म, भोजन आणि वास्तुकला अशा अनेक बाबींमधील साम्यस्थळेही अगदी सहजपणे दिसून येतात. गेल्या काही काळात हे द्विपक्षीय संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. आखाती देशांच्या संदर्भात ‘लूक वेस्ट’ धोरणाचा अंगिकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी सहा वर्षांत अथक प्रयत्न केले. यापैकी काही देशांसोबत संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर सुधारले आहेत. जे निव्वळ द्विपक्षीय संबंधांपलिकडे जाऊन परस्परांप्रती वचनबद्धता जपणारे आहेत. परस्पर स्वारस्याच्या विविध क्षेत्रांमधील या धोरणात्मक संवादांमध्ये निव्वळ औपचारिकता नाही, तर निखळ विश्वासाची भावना दिसून येते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाणिज्य भागीदार
पंतप्रधान मोदी आणि सौदीचे युवराज यांच्या स्तरावर भारत आणि सौदी अरेबिया यांनी ‘धोरणात्मक भागीदारी परिषद‘ स्थापन केली आहे. उच्चस्तरीय मंत्रीगटांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने धोरणात्मक संबंधातही महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. उत्तम व्यापार संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू आणि मनुष्यबळ या दोन्ही घटकांमधील समन्वय, संबंधित प्रमुख नेत्यांच्या वैयक्तिक संपर्क-संवादामुळे अधिक दृढ झाला आहे. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया हे भारताचे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत.  द्विपक्षीय आर्थिक गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. यात ऊर्जा, शुद्धीकरण, पेट्रोरसायने, पायाभूत सुविधा, शेती, खनिज आणि खाणकाम या क्षेत्रांमध्ये रियाधच्या १०० अब्ज डॉलरच्या संभाव्य गुंतवणुकीसह अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारतात थेट परकी गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या १० स्त्रोतांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे.

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देश भारतातील स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (एसपीआर) कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आमच्यासोबत भागीदारी करू शकतात. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संयुक्त अरब अमिरात दौऱ्यादरम्यान झालेल्या एका ऐतिहासिक करारानुसार पहिल्यांदाच, भारतीय तेल कंपन्यांच्या एका समूहाला अबु धाबीच्या लोअर झाकुम तेल क्षेत्रात १० टक्के भागीदारी प्राप्त झाली. ऑगस्ट २०१५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे, पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. २०१८ आणि २०१९ साली त्यांनी पुन्हा तेथे भेट दिली. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी त्यांना सौदी अरेबियाचा ‘किंग अब्दुलाझिझ साश’ पुरस्कार तर २०१९ मध्ये ‘किंग हमद ऑर्डर ऑफ रेनेसान्स’ हा बहरीनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्न आणि वैद्यकीय मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबिया, कतार, ओमान, इराण आणि बहरीन या देशांचे उच्चस्तरीय दौरे केले आणि त्यानंतर आखाती देशांतील मान्यवरांनी नवी दिल्लीला भेट दिली. सप्टेंबरमध्ये कुवेतचे अमीर, शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल सबाह या प्रतिष्ठित नेत्याचे निधन झाले तेव्हा भारत सरकारने देशभरात एक दिवसाचा शोक जाहीर केला. याची कुवेतमध्ये आवर्जून दखल घेण्यात आली. कोविड -१९ ने साथरोगाचे स्वरूप धारण केल्यानंतर दोन्ही देशांच्या नेतृत्वातील या वैयक्तिक संपर्काचा दोन्ही देशांना चांगलाच लाभ झाला.आखाती क्षेत्रात भारताने औषधे, अन्न आणि इतर आवश्‍यक वस्तूंचा अखंड पुरवठा केला आणि तेथील नागरिकांच्या आरोग्यसंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी टाळेबंदीच्या काळात आरोग्य क्षेत्रातील ६ हजार भारतीय व्यावसायिकांना तैनात केले. एप्रिल २०२० मध्ये भारताने क्षमता उभारणीसाठी आणि साथरोगाचा मुकाबला करण्यासंदर्भातल्या अनुभवाबाबत माहिती देण्यासाठी १५ सदस्यांचे एक शीघ्र प्रतिसाद पथक कुवेत येथे पाठविले. 

जगाची वैद्यकशाळा अशी भारताची ओळख निर्माण होत असताना, आखाती देशांच्या आरोग्यसंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठीही भारत प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे, भारतातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना विनाशुल्क तीन सिलेंडर प्रदान करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेसाठी आवश्‍यक असलेली गरज, संयुक्त अरब अमिरातीने त्वरित पूर्ण केली. गेल्या काही महिन्यांत सर्व आखाती देशांनी त्यांच्या देशातील भारतीयांची चांगली काळजी घेतली आहे आणि साथरोगाच्या काळात मायदेशी परतू इच्छिणाऱ्यांना भारतात परतण्याची संधी दिली आहे.

ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत आखाती क्षेत्र हा भारताचा विश्वासार्ह भागीदार आहे तर भारत या क्षेत्राला अन्न सुरक्षा प्रदान करत आहे. हे  नाते आता  निव्वळ व्यावहारिक राहिलेले नसून मैत्रीचे, दृढ सहकार्याचे झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com