बोलायला गडी हुश्‍शार! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 7 जानेवारी 2017

बोलायला गडी नंबरी हुश्‍शार
कुर्ऱ्यात असतोय तालेवार
पण आपल्याला करतोय नमस्कार!
- म्हंजे आम्ही मेलोच की!

साहेब तुमचं धरलं बोट,
आलो हितवर चोखचखोट
मलाच गळ्यात हार घालतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

बोलतंय तर असं लाघवी
जणू गुळाच्या पाकात काकवी
अस्सं गुऱ्हाळ लावतंय बेणं,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

म्हटला, ‘‘अशानं असं होतंय
जुनं दोस्तदार गळपाटतंय!
तुम्हीच द्यावा की पाठबळ, साहेब,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

बोलायला गडी नंबरी हुश्‍शार
कुर्ऱ्यात असतोय तालेवार
पण आपल्याला करतोय नमस्कार!
- म्हंजे आम्ही मेलोच की!

साहेब तुमचं धरलं बोट,
आलो हितवर चोखचखोट
मलाच गळ्यात हार घालतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

बोलतंय तर असं लाघवी
जणू गुळाच्या पाकात काकवी
अस्सं गुऱ्हाळ लावतंय बेणं,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

म्हटला, ‘‘अशानं असं होतंय
जुनं दोस्तदार गळपाटतंय!
तुम्हीच द्यावा की पाठबळ, साहेब,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

बोलतंय तर असं बोलतंय
कुणाला वाटंल, छाताड फुगलंय
मोजून छप्पन इंच भरतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

म्हटला, ‘‘अधूनमधून येतंय हितं
चार युक्‍त्या शिकून घेतं
तुम्हीच आमचं गुरुम्हाराज,’’
- म्हंजे आम्ही मेलोच की!

म्हटला, ‘‘तुपलं-मपलं काही नाही,
समदं राज्ये तुमच्याच पायी,
तर शिंपल कंडम माणूस,’’
- म्हंजे आम्ही मेलोच की!

अस्सं बसतंय, आडवा पाट!
अस्सं चालतंय, घालतोय चाट!
अस्सं बोलतंय, मंजुळ वाणी,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

दणादणा मीटिंगा घेतंय,
भडाभडा भाशाण ठोकतंय,
‘मित्रों’ म्हणत गळा धरतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

येवढी एनर्जी कुठून आणतोय?
कुठल्या चक्‍कीचा आटा खातोय?
विच्यारलं तर म्हणतंय ‘तुमचंच दुकाण!’
- म्हंजे आम्ही मेलोच की!

भराभरा देश फिरतंय
भसाभसा मिठ्या मारतंय
घसाघसा हात मिळवतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

‘‘पण्णास दिवस मोहलत द्या,
चेपलीनं मारा, जर चुकलं उद्या! 
मोजू नका अदेबाज’’ म्हणतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

काही बी करा, कसं बी करा
पब्लिकला कायम ह्याचाच धोसरा!
कितीही म्येलं, तरी बी मारतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

दोन एकरात वांगी घेतली,
नोटाबंदीत समदी किडली
तरीही म्हणतंय, ‘‘भरीत करा,’’
- म्हंजे आम्ही मेलोच की!

काय केलं तर जाईल पीडा?
कसा सुटावा असला तिढा?
एक म्हणता दुसरंच होतंय,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

दुस्मन म्हणावा तर भलतंच लाड!
वस्तादालाच धोबीपछाड?
खाणीत तेच, मातीत तेच,
- म्हंजे आम्ही मेलोच की!

Web Title: dhing tang artical