वचननामा म्हणे! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
शनिवार, 28 जानेवारी 2017

काय गोड तुझे । कसे करु सांग ।
फेडू दे की पांग । तुझे राया ।।

फारा वरषांनी। तुझिया चरणी।
झालो लीन झणी। मतदारा।।

नाही फिरकलो। इतके दिवस।
तरी होती आस। तुझीच रे।।

तूच माझा सखा । तू माझा सांगाती।
करू नको माती। भविष्याची।। 

ऐक रे दयाळा । हरी पांडुरंगा।
फुकाचा गा दंगा। मांडियेला।।

आहे तुझ्या हाती। आता माझी लाज।
नुरला गे माज। माझ्या अंगी।।
विसरलो ऐश। विसरलो ऑडी।
आता मज गोडी। तुझी देवा।।

दारी विलेक्‍शन। उभे की राहिले।
बाशिंग बांधिले। पुन्हा गे म्या।।

काय गोड तुझे । कसे करु सांग ।
फेडू दे की पांग । तुझे राया ।।

फारा वरषांनी। तुझिया चरणी।
झालो लीन झणी। मतदारा।।

नाही फिरकलो। इतके दिवस।
तरी होती आस। तुझीच रे।।

तूच माझा सखा । तू माझा सांगाती।
करू नको माती। भविष्याची।। 

ऐक रे दयाळा । हरी पांडुरंगा।
फुकाचा गा दंगा। मांडियेला।।

आहे तुझ्या हाती। आता माझी लाज।
नुरला गे माज। माझ्या अंगी।।
विसरलो ऐश। विसरलो ऑडी।
आता मज गोडी। तुझी देवा।।

दारी विलेक्‍शन। उभे की राहिले।
बाशिंग बांधिले। पुन्हा गे म्या।।

तेच ढोल ताशे। प्रचार बिचार ।
भाषणे साचार। रोज आता ।।

केला वचननामा । भाजोनिया पोळी ।
फूल न पाकळी । तुझ्या पायी ।।

माझी ही वचने। तुझ्याच कारणे।
चरणे चारणे। काही नाही।।

आपुलिया बळे। कुठे बोलतो मी।
बोलविता डमी। तूचि ना रे?।।
माझी ती वचने। बाकीच्यांच्या थापा।
नुसत्याच गप्पा। टाइमपास।।

तुझ्यासाठी राया। बांधीन धरण।
भरीन पुरण। त्यात आणि।।

तुझ्या शहराचा। करु कायाकल्प।
त्यात गा विकल्प। आणू नको।।

तुझ्यासाठी राया। बांधीन मी पूल।
कर टाकी फुल। घेई धाव।।

झुळझुळीत रस्ते। सुळसुळीत गाड्या।
उंच उंच माड्या। शहरात।।

स्वच्छतेचे येथे। करीन माहेर।
आरसा बाहेर। लाव आता।।
तुझ्या भेटीलागी। धाडिला गा बॉक्‍स।
माफ केला ट्याक्‍स। घराचाही।।

तुझिया कारणे। सारे गा फुकट।
नको कटकट। आता तुझी।।

नाही तुंबणार। पावसाळी पाणी।
गाई मंजुळगाणी। पावसात।।

ऐश्‍या गदारोळी। उभा मीच धीट ।
माहौल टाइट । कितीही होवो।।

ठेवितो जी पायी। हाचि वचननामा।
बराक ओबामा। च्याट पडे।।

नंदी म्हणे ऐसे। कोण करणार।
त्याचा हमीदार। होशील ना?।।

Web Title: dhing tang artical