अमिताभ! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang
तुला पाहातच पिढ्यानपिढ्या
सरकत गेली कवटी आणि
भडकत गेला भेजा, बत्ती पेटली
डोसक्‍यात पर्मनंट,
दिलफेक दौडलो छाती फुटेस्तवर
बदलून टाकला मनाचा आलम
उखडले तंबू उंटासकट,
अरबांची गाडली हाडे वाळवंटात...
कोन कुटला आलाय अमीर?
भाई, आखिर गरीबाला पन
असतोच ना जमीर?

आईशप्पत, एकेकाला
इतक्‍या वेळा धू धू धुतला नाऽऽऽ...
लोळवला भर चाळीच्या चौकात,
मस्तवाल चाळमालक भय्याला
हड्डीपसली केली एक
अचानक उमडलेल्या बरसातीत,
बसस्टॉपवर उभा असताना
समोरून गेलेल्या होंडागाडीतून
खेचून काढला अमीर बापाच्याला,
पाठवले पार्सल अँम्बुलन्समधून अर्जंट.
बारा गावच्या बारा गुंडांना
दिले फेकून फळांच्या गाडीवर,
कोल्ड्रिंकच्या दुकानावर,
फळकुटांच्या झोपड्यावर,
गोडाऊनच्या रिकाम्या पिंपांवर,
बांबूच्या राशीवर...वगैरे.
गरज नसताना पन पाजलं
आवशध धडधाकट आईला,
बोललो, ""मां, मैं हूं ना...''
नजर आढ्याला लावून
बोललो आंटीला डिक्‍टो :
""क्‍या करुं, अपना दिल ही कुछ
ऐसा है, मौसी!''

सोनेरी केसांच्या देखण्या
राजकुमाराच्या घोड्याला
चाट घालून पाडलेस तू, आणि
खुदबखुद बनलास एक जुनून!
थुंकलास...युगप्रवर्तक थुंकलास,
अमीर लोकांच्या बिल्लोरी जिंदगानीवर
आणि पेटवलीस विडी सुरुंगाच्या वातीने,
घातलीस एक सणसणीत लांबलचक
लाथ खुर्चीवर, केलीस वार्ता :
""ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे
बाप का घर नही...नही...नही..नही...'',
दिलास खुल्ला आवाज आमनेसामने :
"आज भी मैं फेंके हुए पैसे नही उठाता!'
सीधा देवालाच घेतलास फैलावर :
"बहोत खुश होगे तुम आज...बहोत खुश...'
तेव्हा, घंटा वाजल्या ना रे...ढझनभर, घंटा!
""भोत मारा मेरे को, मालूम, भोत मारा...''
असे आरशातल्या स्वत:लाच
मलमपट्टी करणाऱ्या तुला
बघूनच एक नाय, अनेक सांजा
केल्या रोशन कानफुटक्‍या कपात
बुडवला सूर्य काठोकाठ आणि
जीभेवर घासलेल्या तिखटमीठानंतर
दुनियेचा केला तवापुलाव, बुर्जी वगैरे.

भिंतीला टेकून भरदार आवाजात
बोललो अनेकदा : हां...मुझे
तुमसे मुहब्बत है, मुहब्बत है, मुहब्बत है...

लेकिन कभी कभी मेरे दिल में
ये खयाल आता है के...

तू नसतास तर बिघडले काय असते?
दुनिया जहन्नुममध्ये गेली असती,
की जहन्नुम आला असता चढून,
चाळीचा मोडका जिना चढून?
जुम्म्याला जुम्माने दिला असता चुम्मा?
रंगले असते बनारसवाले पान?
आर. के. गुप्ताच्या बिडलिंगात
बसले असते गरीबाचे संसार?
झाले असते बारा मुल्कों की पुलिस
डॉनला पकडण्यात कामयाब?

आज तुला बघतो गबानाच्या
जंटलमन सुटात, विचारतोस
सवाल करोडोंचे...करतोस
फॅमिलीवाले ज्योक, हसवतोस
जंटलमन लोकांना...
तुझ्या एकाही सवालाचे
उत्तर आपल्याकडे अजूनही नाय, भाई!

ये कहां आ गए हम यूंही साथ साथ चलते?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com