बुर्ज कमल! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 19 एप्रिल 2017

प्रिय चि. नानासाहेब फडणवीस, 
अनेक उत्तम आशीर्वाद. 

परवा भुवनेश्‍वरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मांडवात आपली उभ्या उभ्या भेट झाली. जेवणाच्या मांडवात होणाऱ्या भेटी मी तं काही जमेस धरत नै!! एका हातात प्लेटीचा ब्यालन्स सांभाळायचा, दुसरा हात खरकटा होऊन जातो. सबब एका गावचे असून गप्पा काही झाल्या नाहीत. म्हणून हे पत्र लिहून ऱ्हायलो आहे.

मध्यंतरी दुबईले जाऊन आलो. तिथली उंचच उंच इमारत बघून आपण तं बुवा इंप्रेस झालो. डोक्‍यावरची ओव्हरशीअर क्‍याप खालीच पडून गेली. ‘‘बाप्पा! क्‍येवढी उंच इमारत बे!! येवढी उंच बांधतात का?’’ मी पीएले विचारले. पीएने खांदे उडवले. 

प्रिय चि. नानासाहेब फडणवीस, 
अनेक उत्तम आशीर्वाद. 

परवा भुवनेश्‍वरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मांडवात आपली उभ्या उभ्या भेट झाली. जेवणाच्या मांडवात होणाऱ्या भेटी मी तं काही जमेस धरत नै!! एका हातात प्लेटीचा ब्यालन्स सांभाळायचा, दुसरा हात खरकटा होऊन जातो. सबब एका गावचे असून गप्पा काही झाल्या नाहीत. म्हणून हे पत्र लिहून ऱ्हायलो आहे.

मध्यंतरी दुबईले जाऊन आलो. तिथली उंचच उंच इमारत बघून आपण तं बुवा इंप्रेस झालो. डोक्‍यावरची ओव्हरशीअर क्‍याप खालीच पडून गेली. ‘‘बाप्पा! क्‍येवढी उंच इमारत बे!! येवढी उंच बांधतात का?’’ मी पीएले विचारले. पीएने खांदे उडवले. 

‘‘भाऊ, ही कायची बिल्डिंग राहाते?’’ मी पीएले विचारले.

‘‘सर, ही बुर्ज खलिफा बिल्डिंग राहाते सर! आपल्या साइडची सर्वात हायटेड बिल्डिंग आहे, सर!,’’ पीएसाहेबांनी जनरल नालेज दिले. दुबईमधली सदर इमारत २०९ मजली असून, ८२८ मीटर उंच आहे. पोते शिवायची दाभण ढाबळीत घुसल्यासारखी ही बुर्ज खलिफा दुबईच्या आभाळात घुसून गेली आहे. वरळीचा सीलिंक आडव्याचा उभा केला तं अस्साच दिसेल, असे आमचे पीए म्हणाले. 

‘‘ऐसी बिल्डिंग अपने इंडिया में भी होना, बावा!’’ मान डुलवत मी म्हणालो. हाओ!!

‘‘तुम्हाला काय अशक्‍य आहे सर! तुम्ही मनात आणाल तर मुंबईच्या घाटकोपरचा उड्डाण पूलसुद्धा दोन दिवसात दुरुस्त कराल सर!!’’ पीएने इंजिनिअरिंगवाली आयडिया दिली. ते स्वत: घाटकोपरले राहतात, असे दिसते. ह्यांले कोणी पीए नेमला कोण जाणे!! पण जाऊ दे.

आपल्या नागपूरला जगातली उंच बिल्डिंग बांधून द्यायचे माझे जुने स्वप्न आहे. जुने म्हंजे अगदी फ्लायओव्हरच्याही आधीचे!! आपल्या रेशीमबागेतच अशी बिल्डिंग उभी करून देऊ, असा विचार आला. शेवटी तिथे (स्कूटरवर) जाऊन आपल्या पूज्य भागवतजींन्ले भेटलो. 

‘‘जागा कमी पडून ऱ्हायली, तुम्हाले आता!,’’ चहा-चिवडा होता होता मी हळूच विषय काढला. 

‘‘वैसे इस वसुंधरापर जगह होती नही...बनाई जाती है! और कार्यकर्ता का यही धर्म होना चाहिए की जितनी आवश्‍यक है, उतनी जगह बने!! यह सृष्टीका नियमही है, और नियम सर्वोपरी होतें है...,’’ आयता तावडीत सापडल्याने त्यांनी माझे बौद्धिक घेऊन घेतले. दोन-तीन तास पेंगून परत आलो, झाले! शेवटी रेशीमबागेचा नाद सोडून आमच्या महाल भागातच ही बिल्डिंग बांधायचा विचार सुरू केला. गडकरीवाडा रिडेव्हलप करताना लगेहाथ तीनशे मजली बिल्डिंग उठवावी, अशी आयडिया होती. पण लोक बोलतील की बिल्डिंग उठवता उठवता ह्यांनी गडकरीवाड्याच्या रिडेव्हलपमेंटचेही उरकून घेतले!! नकोच ते!! 

बिल्डिंगचा प्लॅन तं तयार झाला होता. पण असाच एकदा भेंडोळे उलगडून बसलो असताना, आपले श्रीहरिभाऊ अणेमहाराज आले आणि ‘‘व्वा, व्वा! बांधून द्याच तुम्ही ही बिल्डिंग! आमच्या स्वतंत्र विदर्भाले मिळून जाईल आयती!!’’ असे उद्‌गार त्यांनी काढले. त्याक्षणी बिल्डिंगच्या प्लॅनची सुरनळी केली आणि...ठेवून दिली!!

माझ्या मनात आले की मुंबईतच अशी जगातली सर्वात उंच बिल्डिंग का उभी करू नये? सांगावयास आनंद होतो की योजना तयार झाली आहे. मंजुरीसाठी फाईल श्रीश्री नमोजी ह्यांच्या टेबलावर पोहोचून पण गेली आहे. नमोजी आपले टेबल कायम स्वच्छ ठेवतात. येईल त्या फायलीवर सह्या मारून निकाली काढतात. त्यामुळे लौकरच आपल्या गगनभेदी योजनेला मंजुरी मिळून जाईल, असे दिसते. बिल्डिंगचे नाव ‘बुर्ज कमल’ असे ठेवावे, असे मनात आहे. तुम्हाले काही सुचले तं कळवावे!! बाकी भेटीअंती बोलूच. कळावे. 

आपला. नितीनभू.
ता. क. : काहीही नाव ठेवा, पण ‘आदर्श’ हे नाव नको!! 

Web Title: Dhing tang on bjp