मृत्यूचे क्रांतिगीत! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

बरं का, कुण्या एका बेटावर
कोणे एके काळी
एक क्रांती झाली...
क्रांतीला पिल्ले झाली.
क्रांतीची पिल्ले मोठी होऊन त्यांनासुद्धा पिल्ले झाली...

क्रांती आपली पिल्ले खाते,
ही एक शुद्ध अफवा आहे.
कारण या पिल्लांनीच
क्रांतीचा पास्ता करून खाऊन टाकला !
इन अदर वर्डस...
खांद्यावर बंदूक ठेवत
धीरोदात्त पावले टाकत
जुलमाचे प्रतीक ठरलेले
सिंहासन लाथेने उलथून 
तेथेच दुसरी भलीमोठी
खुर्ची ठेवून गुडघ्यावर
आडवा पाय टाकत
टेचात बसलेल्या
क्रांतीच्या महानायकाने
सुखाने कालक्रमणा सुरू केली.

बरं का, कुण्या एका बेटावर
कोणे एके काळी
एक क्रांती झाली...
क्रांतीला पिल्ले झाली.
क्रांतीची पिल्ले मोठी होऊन त्यांनासुद्धा पिल्ले झाली...

क्रांती आपली पिल्ले खाते,
ही एक शुद्ध अफवा आहे.
कारण या पिल्लांनीच
क्रांतीचा पास्ता करून खाऊन टाकला !
इन अदर वर्डस...
खांद्यावर बंदूक ठेवत
धीरोदात्त पावले टाकत
जुलमाचे प्रतीक ठरलेले
सिंहासन लाथेने उलथून 
तेथेच दुसरी भलीमोठी
खुर्ची ठेवून गुडघ्यावर
आडवा पाय टाकत
टेचात बसलेल्या
क्रांतीच्या महानायकाने
सुखाने कालक्रमणा सुरू केली.

क्रांतीचा महानायक अखेर
बेटाचा राजा झाला
त्याची ही कहाणी...
क्रांतीच्या महानायकाची जितकी गाणी,
तितक्‍याच त्याच्या मैतरिणी!
कटवाल्यांनी फितवलेल्या त्याच्या
एका मैतरिणीने दडविली एक
विषगोळी सौंदर्य प्रसाधनात, आणि
ओढले त्याला शयनगृहात गुपचूप.

पण हाय! विषगोळी ऐनवेळी
प्रसाधनातच विरघळली.
मैतरिणीचा जीवघेणा कट
वळखून शय्येवर आडव्या
पडलेल्या महानायकाने
भरदार दाढीतच दडवले
अस्फुट हास्य... म्हणाला ः
‘‘बेबे, तुझी आता गोचीच झाली.
मला मारायला आलीस, आणि
आता स्वतःच मेलीस.
मैतरिण म्हणाली ः सॉरी, सॉरी ः
महानायकाने तिला पाचारिले
शय्येवर, म्हणाला ः बेबे,
माझ्या आयुष्याची दोरी
भलतीच टणक आणि लांबलचक!
तुझा वृथा पराभव झाला...
आता काय करायचे?
माझ्या खुनाचा तू केलेला,
आणि फशी पडलेला
कट क्रमांक ः सहाशे अडोतीस!’’

त्यावर खुनी प्रेमिका
घामाने डवरली !
तिच्या अनावृत्त देहावरले
उन्मादक रंग उडून गेले.
परम पराभूत म्हातारीप्रमाणे
ती महानायकाची
करुणा भाकूं लागली...
तेव्हा...
त्या दिलादार महानायकाने
उश्‍याखालचे पिस्तूल काढून
दिधले तिच्या हाती, म्हणाला -
‘‘प्रिये, तुला पराभूत 
होताना कसे पाहू?
कशीही असलीस तरी तू
महानायकाची सहेली आहेस.
घे हे पिस्तूल आणि ओढ चाप!’’
प्रियतमेचे पुढे काय झाले,
कुणालाच कधीच कळले नाही 
पण -
वयाच्या पाऊणशेव्या वर्षी
महानायकाला एका भक्ताने
गालापॅगोस बेटावरले
महाकाय कासव दिले भेट,
तेव्हा जमेल तितक्‍या नम्रपणे
महानायकाने नाकारली ती
जिवंत भेट, आणि म्हणाला
‘‘मित्रा, हे कासव अवघी
शंभर वर्षे जगत्ये.
पाळीव प्राणी असाच
लावतात जीव आणि,
चटशिरीं मरून जातात...
मग मजसारख्या कविमनाच्या
क्रांतिकारकाने शोक
कसा करायचा? त्यापेक्षा
नकोच ते तुझे अल्पायुषी कासव!’’
... असा हा महानायक यथावकाश
वृद्धापकाळाने निवर्तला, 
तेव्हा साक्षात मृत्यूदेखील
(क्रांतीच्या अजुनी हयात पिल्लांसमवेत)
क्रांतीचेच गीत गुणगुणत होता
अशी वदंता आहे...

खरे खोटे मृत्यूच जाणे!

Web Title: dhing-tang-british-nandy