महज कागज के टुकडे (ढिंग टांग)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

जेहत्ते कालाचें ठायीं
आम्ही उभे आहोत,
मुमुक्षुंच्या रांगेत.

मोक्ष दे गा, दयाघना, मोक्ष दे!

आमचे हडाडलेले सापळे,
झडलेली काया,
आटलेली माया 
पाहूनदेखील तुला अजुनी
करुणा येत नाही का रे?

कुबेर तूझा भांडारी।
आम्हां फिरविसी दारोदारी।
यांत पुरुषार्थ मुरारी।
काय तुजला पैं आला?।।

खरेच कोण आहेस तू?
ओळखीचा आहेस की
संपूर्णतया अजनबी?
देवदूत आहेस की दैत्य?
भाबडा आहेस की क्रूर?
महानायक आहेस की खलनायक?

जेहत्ते कालाचें ठायीं
आम्ही उभे आहोत,
मुमुक्षुंच्या रांगेत.

मोक्ष दे गा, दयाघना, मोक्ष दे!

आमचे हडाडलेले सापळे,
झडलेली काया,
आटलेली माया 
पाहूनदेखील तुला अजुनी
करुणा येत नाही का रे?

कुबेर तूझा भांडारी।
आम्हां फिरविसी दारोदारी।
यांत पुरुषार्थ मुरारी।
काय तुजला पैं आला?।।

खरेच कोण आहेस तू?
ओळखीचा आहेस की
संपूर्णतया अजनबी?
देवदूत आहेस की दैत्य?
भाबडा आहेस की क्रूर?
महानायक आहेस की खलनायक?

देवदूत म्हणावे तर-
तुझ्या निर्विकार नेत्रांमध्ये
उमटताना दिसते
एक खुनशी लकीर.

तुझ्या मार्दवयुक्‍त मंत्रोच्चारणातही
हलकेच मिसळून गेले आहे
यज्ञभूमीतील खुंटावर बांधलेल्या
अजापुत्राचे असहाय विव्हळणे.

दरवेळी डबडबणाऱ्या
तुझ्या डोळ्यांतील अश्रूथेंबात
जाणवतात विषारी फुत्कार. 
आश्‍वासनांच्या कदलीवनातून
वाहात जातात लोणकढी वारे.

हे तथाकथित महानायका-
तुझ्या खड्‌गाच्या खणखणाटाने
तुझ्या चौटाप उधळलेल्या अश्‍वाने
निश्‍चिंत पहुडल्या होत्या सरहद्दी!
गिल्या गिल्या होत गेल्या 
गनिमांच्या पाटलोणी
शत्रूच्या तलवारींची झाली
गांडुळे क्षणार्धात!

पण असे असूनही
आम्ही कां आहोत उभे
भुईसुरुंग पसरलेल्या रणक्षेत्रात?

होय, गुंतून गेलो आम्ही तुझ्या
आश्‍वासक स्मितात.
झालोच जेरबंद तुझ्या
उगारलेल्या वज्रमुठीत.
तुझ्या स्वप्नांच्या दुकानातले
नेहमीचे गिऱ्हाईक बनून
सतत विकत घेत राहिलो
किराणा किरकोळ भावात.

पण हे पतितपावना-
दशदिशांतून दिशाकोनांमधून
अजूनही हलताहेत अंधारसावल्या
अजूनही घुत्कारताहेत दिवाभीते,
झडपताहेत वटवाघळे
टोकदार पंखांच्या भाल्यांनिशी
शनवारवाड्यातल्या गारद्यांसारखी.

कोणे एके काळी
एका उजळलेल्या मध्यरात्री 
आम्ही केला होता एक 
ऐतिहासिक करार नियतीशी.

मांडला होता नवा डाव
नव्या उमेदीने नव्या विटीसकट...
होष्यमाणाच्या धारदार
चक्रावर कातून काढले होते 
स्वत:चे शरीर आणि 
स्वत:च्याच रक्‍ताची
शिंपण करीत ओरडलो 
होतो : हे करुणाकरा,
तू आहेस की नाही, 
नाही माहीत, पण
आम्ही आहोत...आम्ही आहोत!

आम्ही (ही) उरलो आहोत,
नियतीशी केलेल्या कराराच्या 
दस्तावेजातील फक्‍त नावे...

किंवा-

चलनातून बाद 
झालेल्या नोटांप्रमाणे
निरर्थक. निकम्मे. नामशेष.

महज कागज के टुकडे!
महज कागज के टुकडे!

Web Title: dhing-tang-british-nandy

टॅग्स