कलजुग! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 3 जून 2017

रामचंद्र कहे गए सियासे
ऐसा कलजुग आएगा..
हंस चुगेगा दाना दुनका
कौआ मोती खाएगा...

नद्या कोरड्या, विहिरी बुजतील
हापशी टाकी उसासे
डोळ्यांमधले आटेल पाणी
नशीब देईल झासे
आणि दुधाची गंगा तेव्हा
सडकेमधुनी वाहील गा...

रामचंद्र कहे गए सियासे
ऐसा कलजुग आएगा..
हंस चुगेगा दाना दुनका
कौआ मोती खाएगा...

नद्या कोरड्या, विहिरी बुजतील
हापशी टाकी उसासे
डोळ्यांमधले आटेल पाणी
नशीब देईल झासे
आणि दुधाची गंगा तेव्हा
सडकेमधुनी वाहील गा...

हंस चुगेगा दाना दुनका
कौआ मोती खाएगा...

शेते सुकतील, मॉल बहरतील
दुष्काळाचे फुलती मळे
शेतशिवारी विस्तव आणि
चुल्ह्यामध्ये शेणखळे
शहरामध्ये रोज दिवाळी,
बांधावरती रे शिमगा...

हंस चुगेगा दाना दुनका
कौवा मोती खाएगा...

देश की धरती सोना उगले,
उगले हिरे मोती...
दिडदमडीच्या मक्‍कईफुलांचे
पॉपकॉर्न की होती...
वरणामध्ये घाणचि झाली,
तूरडाळ मग देई दगा...

हंस चुगेगा दाना दुनका
कौवा मोती खाएगा...

शिवारातल्या बांधावरती
येईल टूर नि यात्रा
संवादाच्या नावाखाली
हाती देईल फत्रा
शेतकऱ्याचा कुणी न सोयरा
आणि कुणी ना येथ सगा...

हंस चुगेगा दाना दुनका
कौवा मोती खाएगा...

तुला दयाळा का न फुटे गा
शेतकऱ्याचा पान्हा
टाळ्यांसाठी वाजवितो का
पावा तुमचा कान्हा?
ब्रह्म नासले, विश्‍व बुडाले
कैवल्याचा फुटे फुगा...

हंस चुगेगा दाना दुनका
कौवा मोती खाएगा

व्होट बोट औ राजनीत के
सब है कारोबारी
"प्रजातंत्र की जय हो' ऐसा
कहेगी दुनिया सारी
बीज पिरोनेवाला इक दिन
माटी में मिल जाएगा...

बोलो बोलो,
रामचंद्र कहे गए सिया से....

Web Title: dhing tang by british nandy

टॅग्स