चिंता वाढवणारा प्रचाराचा स्तर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

राज्यभर निवडणुकीची ‘दंगल’ सुरू असताना विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होऊ घातले आहे. अकोला आणि नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात तर  मराठवाडा, कोकण व नागपूरच्या शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. वरिष्ठ सभागृह असलेली महाराष्ट्रासारखी राज्ये बोटावर मोजण्याएवढी. त्यातच पदवीधर, शिक्षक अशा समाजाला दिशा देणे अभिप्रेत असलेल्या वर्गासाठी वेगळे मतदारसंघ ठेवल्याने कायदेमंडळात भरीव योगदान देणारे निवडून जावेत, अशी घटनाकारांची अपेक्षा. अलिकडे या अपेक्षेलाच हरताळ फासला जातो आहे काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील या निवडणुकांतील महत्त्वाचे उमेदवार.

राज्यभर निवडणुकीची ‘दंगल’ सुरू असताना विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होऊ घातले आहे. अकोला आणि नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात तर  मराठवाडा, कोकण व नागपूरच्या शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. वरिष्ठ सभागृह असलेली महाराष्ट्रासारखी राज्ये बोटावर मोजण्याएवढी. त्यातच पदवीधर, शिक्षक अशा समाजाला दिशा देणे अभिप्रेत असलेल्या वर्गासाठी वेगळे मतदारसंघ ठेवल्याने कायदेमंडळात भरीव योगदान देणारे निवडून जावेत, अशी घटनाकारांची अपेक्षा. अलिकडे या अपेक्षेलाच हरताळ फासला जातो आहे काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील या निवडणुकांतील महत्त्वाचे उमेदवार. अकोला मतदारसंघात त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत, ते त्यांच्या निकटच्या वर्तुळातूनच केले गेले, असे म्हणतात. नाशिक पदवीधर आणि मराठवाडा शिक्षक अशा दोन जागा परस्परांकडे राखता याव्यात, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांशी हातमिळवणी केली आहे. त्याचे फलित नक्की काय असेल ते कळेलच. कोकण शिक्षक मतदारसंघात मावळत्या आमदारांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाळी केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातही थोड्या कुरबुरी आहेतच. सत्ता हाती येताच वाढलेल्या महत्त्वाकांक्षामुळे ईर्षा वाढली आहे आणि स्पर्धाही. शिवाय शिक्षक आणि पदवीधर अशा वर्गवारीतही मतदारांना प्रलोभने दाखवण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकूण घटनाक्रम चिंता वाढवणारा आहे. 

वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी युतीला बहुमत नाही. ते मिळवण्यासाठी अधिकाधिक जागा जिंकणे आवश्‍यक ठरते. मात्र महाराष्ट्राच्या ‘चौकोनी’ राजकारणात आपापली प्रभावक्षेत्रे प्रत्येक पक्ष राखून आहे. त्यातच शिक्षक संघटनांच्या आघाड्याही राजकारण पुढे नेत असतात. दोन्ही वर्गवारीत मतदार अधिक नोंदवणाऱ्याशी सरशी होणे निश्‍चित असते. त्यामुळे ज्याच्या हाती नोंदणीचे बळ त्यालाच मिळणार फळ हे निश्‍चित आहे. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे प्रभाव पाडू शकतात काय, ते पाहायचे. डॉ. पाटील हे कुशल शल्यविशारद आहेत.

पक्षांर्गत गटबाजीच्या रोगावर ते उपाय शोधण्यात यशस्वी ठरतात काय, ते निकालातून स्पष्ट होईल. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धीकरणाला या छोट्या मतदारसंघातही प्रारंभ करता येत नसल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे, ते दुर्देवी आहे.

Web Title: editorial artical