प्रतिभा आणि मेहनत

- डॉ. अण मांडे
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मी अमरावतीला कॉलेजमध्ये असताना लिहायला सुरवात केली. रोज रात्री माझा मित्र अरुण खेरडेच्या स्टुडिओत आमचा अड्डा असे. खेरडेनं एकदा विचारलं, ‘एवढ्यात तू काय लिहिलंस?’ दोन-चार कथा गाजल्यामुळं मला जरा शिंगं फुटली होती. मी म्हणालो, ‘मूड असला तरच मी लिहितो.’ तो हसला आणि त्यानं एक किस्सा सांगितला. खेरडे जे. जे. स्कूलमधला.

पळशीकरांचा शिष्य. तो जी. डी. आर्टसच्या शेवटच्या वर्षाला असताना पळशीकरांनी विचारलं, ‘एवढ्यात काय काढलंस तू?’ तो म्हणाला, ‘मूड असला, तरच पेंटिंग करतो.’ पळशीकर म्हणाले, ‘उद्यापासून तू रोज मला दहा चित्रं काढून दाखवायची. नाहीतर तुला परीक्षेला बसू देणार नाही.’

दुसऱ्या दिवशीपासून त्यानं दहा चित्रं काढायची आणि सरांना दाखवायची, असा परिपाठ सुरू झाला. सर ती चित्रं बघायचे आणि विचारायचे, ‘यातलं तुला कोणतं आवडलं?’ मग तो त्याला आवडलेलं चित्र दाखवायचा. ते चित्र सर बाजूला काढून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दहा चित्रं काढून दाखवायचा. त्यातलं त्याचं आवडतं चित्र ते बाजूला ठेवायचे. महिन्याभरात त्यानं तीनशे चित्रं काढली. त्यातली तीस चित्रं सरांनी बाजूला काढली.

महिन्याच्या शेवटी सरांनी ती तीस चित्रं त्याला दाखवून विचारलं, ‘यातलं तुला कोणतं आवडलं?’ त्यानं त्या तीस चित्रांपैकी सर्वांत आवडलेलं चित्र बाजूला काढलं. सर म्हणाले, ‘चित्राच्या पाठीमागं बघ.’ त्यानं बघितलं. मागं सरांनी सही केली होती. त्यांनासुद्धा हेच चित्रं आवडलं होतं. ते म्हणाले, ‘बघ, तू तीनशे चित्रं काढलीस म्हणून त्यातलं सर्वांत चांगलं चित्रं हे निघालं. तू मूड नाही म्हणून काहीच काढलं नसतं, तर हे तरी काढता आलं असतं का?’’

जी.डी. आर्टचं त्यावर्षीचं गोल्ड मेडल त्याला मिळालं. त्यानंतर उमेदवारीच्या काळात त्यानं जे. पी. सिंघलकडे काम केलं. सत्तरच्या दशकात सिंघल हे कॅलेंडरच्या क्षेत्रात प्रसिद्ध होते. नोकरीच्या पहिल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यासाठी सिंघल यांनी त्याला  अर्धवट काढलेलं कॅलेंडर दाखवलं आणि म्हणाले, ‘यातली जरा फुलं काढून दाखव. मग तुला कामावर ठेवायचं की नाही बघू.’ त्या चित्रात एक तरुणी जमिनीवर पहुडलेली होती आणि तिच्या अंगावर आणि भोवताली मोगऱ्याच्या फुलांचा सडा पडला होता. सिंघल म्हणाले, ‘तुला ही भोवतालची मोगऱ्याची फुलं काढायचीयत.’ ती अंदाजे तीन हजार फुलं काढायची होती. प्रत्येक फुलाचा जमिनीवरचा कोन वेगळा, त्यावरचा प्रकाश वेगळा, अशी फुलं काढणं आव्हानच होतं; पण खेरडेनं ते स्वीकारलं. चित्र पूर्ण झाल्यावर ते बघून सिंघल खूष झाले. म्हणाले, ‘आजपर्यंत चार-पाच जण माझ्याकडे आले आणि ही फुलं काढून कंटाळून निघून गेले. जिद्दीनं चित्र पूर्ण करणारा तूच पाहिला.’ मग सिंघलनी एक  प्रश्‍न विचारला. ‘तू पळशीकरांचा शिष्य आहेस काय?’ किस्सा सांगितल्यावर खेरडे म्हणाला, ‘दहा टक्के प्रतिभा सगळ्यांकडेच असते. पण नव्वद टक्के मेहनत कुणी करत नाही. जो करतो तोच खरा कलावंत.’
त्यानंतर आजपर्यंत लिहिण्यासाठी मला मूडची कधीच आवश्‍यकता भासली नाही.

Web Title: editorial artical dr. aan mande

टॅग्स