ढिंग टांग : तुम एक पैसा दोगे..!

Dhing-Tang
Dhing-Tang

इम्रान : (खड्या सुरात) गरीबों की सुनोऽऽ वो तुम्हाऽऽरी सुनेगा...तुम एक पैसा दोगे...वो दस लाख देगाऽऽ....
नमोजी : (बंद दाराआडूनच) छुट्टा नही, आगे जाव!
इम्रान : (अजीजीने) छुट्टा मैं दिला दूंगा सेठ! 
नमोजी : (दार उघडून) कशाला खालीपिली माझा डोका खाते! आगळ जाव ने!! (वैतागून घरात डोकावत) अरे, मोटाभाई, जुओ तो कोण आव्या छे? मने तो कोई भिकारी लागे छे! एने एक रुपिया आपो!!
इम्रान : (केविलवाण्या आवाजात) मी भिखारी नाही, जनाब! तुमचा पडोसी आहे, पडोसी!!
नमोजी : (च्याट पडत) म्हारा पडोसी? तो आ शुं फेन्सी ड्रेस छे? तद्दन भिकारी लागे छे!!
इम्रान : (पडेल आवाजात) तुमच्या नेटिझन अवामने माझी ही हालत केली आहे, जनाब! गुगल सर्चमध्ये इम्रान टाइप केलं की माझे भिकाऱ्यासारखे फोटो दणादणा येऊन पडतात!! ये सरासर नाइन्साफी है, जनाब! असा मी काय गुनाह केला? थोडेसे दहशतगर्द तुमच्याकडे पाठवत राहिलो, त्याची ही सजा? एक क्रिकेटर को भिकारी बना दिया तुम लोगों ने?
नमोजी : (कानाची पाळी पकडत) अरे नाय नाय! आम्ही तुम्हाला कशाला भिकारी म्हणेल? तुमच्या देसाच्या दिवाळा निघाला, तरी आम्ही कधी बोललो नाय! तुमच्या प्राइम मिनिस्टरच्या घराच्या लगनच्या हॉल झ्याला, तरी पण आम्ही कधी बोललो नाय! तमारे मुल्क मां टमाटरना भाव शुं छे?
इम्रान : (थोडं आठवून) दोनशे रुपये किलो असेल! का हो?
नमोजी : (आणखी टोचत) आ बद्धा दिवालियानां लक्षण छे! पण दिवालिया असला म्हणून काय झ्याला, तमे तो पडोसी छो! आम्ही पडोसीधरम पाळते!
इम्रान : (निर्वाणीच्या सुरात) जनाब, आखरी बार बोल रहा हूं! तुम्ही बालाकोटवर सर्जिकल स्ट्राइक केला! आमचं हवाईजहाज पाडलं! तरीही आम्ही अच्छे पडोसे होने के नाते तुमचा पायलट परत केला! कश्‍मीरमध्ये आम्ही थोडीशी दहशतगर्दी काय केली, तर तुम्ही डायरेक्‍ट ३७० कलमच हटवून कश्‍मीर ढापलं! आता तुम्ही आझाद कश्‍मीर घेण्याची जुबां चालवत आहात! हे सगळं मी सहन करतोय! पण माझे भिकाऱ्याच्या वेषातले फोटो मी बिलकुल सहन करणार नाही!!
नमोजी : (खांदे उडवत) सहन करणार नाही? तो शुं करीश?
इम्रान : (निर्धाराने) अब तो जंग होगी!! 
नमोजी : (कुत्सितपणे) फू:!! भिकाऱ्याच्या कटोरा घेऊनशी जंग कसा करणार? 
इम्रान : (खवळून) खामोश!! भिकाऱ्याच्या लिबासमध्ये असलो तरी अमीर आहोत आम्ही!! जास्त हुशारी कराल तर बघून घेऊ!!
नमोजी : (समजूत घालत) जरा कान अहियां करो (कुजबुजत) जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो गोतो खाय! सांभळ्यो? उंटच्या पाछळच्या बाजूला जाऊन किस घेयाला कॉण सांगते तुम्हाला?
इम्रान : (बुचकळ्यात पडत) ऊंटच्या पाछळ बाजूला म्हंजे?
नमोजी : (घाईघाईने) जवां दे! तमे एक काम करो! कश्‍मीरनी वात तो हवे पती गयु!! पीओकेनां निगोशिएशन करवु होय, तो बतावो!
इम्रान : (चवताळून) जिंदगीत तुम्हाला पीओके देणार नाही! भीक मागीन पण-
नमोजी : (समजूत घालत) जुओ इमरानभाई, बेगर्स डू नोट हॅव चोईस!! (त्याच्या कटोऱ्यात डोकावत) ए मां शुं छे?
इम्रान : (केविलवाण्या अवस्थेत) इथे येत होतो तेव्हा दोघा-तिघांनी थोडी नाणी टाकली हो! हे बघा, (डोकावून पाहत) ओह गॉड...तुम्ही तीसुद्धा काढून घेतलीत की काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com